पोस्ट्स

environment लेबलसह पोस्ट दाखवत आहे

जॉनी ऍपलसीड

    लहान असतांना "The Wonderworld of Science" या पुस्तकाचे मराठी अनुवाद "विज्ञानाचे नवलपरीचे जग" वाचले होते,नक्की कोणता भाग ते आठवत नाही.हे पुस्तक मला जाम आवडायचे. कित्येकदा पारायणे केली असतील. खरं तर मी लिहिणे-वाचणे शिकल्यावर वाचलेल्या पहिल्या ५ पुस्तकांतले एक म्हणजे हे पुस्तक.लहान मुलांना लक्षात ठेवूनच लिहिलेले असल्याने विज्ञानाच्या छोट्या छोट्या गोष्टी, सिद्धांत सोप्या भाषेत समजावल्या होत्या.खूप उदाहरणे होती.या पुस्तकामुळे विज्ञानाची गोडी अगदी लहान वयातच निर्माण झाली आणि का? व कसे? यांचे समाधान लहान वयातच झाले. १९४०-५० च्या दशकात ते पुस्तक लिहिलेले होते. मराठी अनुवाद कुणी केला होता ते आता आठवत नाही पण हे पुस्तक मूळ इंग्रजी असेल अशी शंकाही न येण्याइतका सुरेख अनुवाद होता.      या पुस्तकात असलेल्या अनेक छोट्या कथांपैकी एक म्हणजे जॉनी ऍपलसीडची कथा.अठराव्या शतकाच्या सुमारास हा भटक्या एकहाती सफरचंदाचे बगीचे उभारत भटकायचा.डोक्यावर टीनाचे टोप आणि खांद्यावर एक काठीला टांगलेली सफरचंदाच्या बियांची पिशवी असे एक रेखाचित्रही होते. याने जेथे सफरचंदाच्या बागा ल