माझी कविता कुठेय ?
"एङ्गे एनदं कविदई " या तमिळ गाण्य़ाचा मी मराठीत अनुवाद करायचा प्रयत्न केलाय.कितपत यशस्वी झालाय ते माहीत नाही.आपल्या तुटपुंज्या तमिऴ ज्ञानाच्या बळावर हे धारिष्ट्य करतोय. चित्रपटाचे नाव :- कन्डुकोन्डेन कन्डुकोन्डेन संगीतकार :- ए. आर. रहमान गीतकार :- वैरामुत्तु याआधी मी जे तमिऴ गाणे अनुवादित केले होते तेदेखील वैरामुत्तु सरांचेच होते. "गुलज़ार-रहमान "ही जशी हिंदीत नावाजलेली जोडी आहे तशीच "वैरामुत्तु-रहमान " ही तमिऴमध्ये नावाजलेली आहे. अगदी काल-परवापर्यंत या गाण्याचा अनुवाद करायचा विचार डोक्यात नव्हता. हपिसातल्या एका मित्राने म्हटले की त्याला तमिऴ समजत नाही, पण हे गाणे खूप आवडते, अर्थ जाणून घ्यायला आवडेल.म्हणून मग मी हा अनुवाद हाती घेतला. सुंदर कविता आहे.जर तुम्हाला हे गाणे आवडले नाही तर तो दोष माझा,माझ्या अनुवाद-क्षमतेचा, वैरामुत्तु सरांचा नव्हे. ...