माझी कविता कुठेय ?

        "एङ्गे एनदं कविदई " या तमिळ गाण्य़ाचा मी मराठीत अनुवाद करायचा प्रयत्न केलाय.कितपत यशस्वी झालाय ते माहीत नाही.आपल्या तुटपुंज्या तमिऴ ज्ञानाच्या बळावर हे धारिष्ट्य करतोय. 

         चित्रपटाचे नाव :- कन्डुकोन्डेन कन्डुकोन्डेन 
         संगीतकार :- ए. आर. रहमान
        गीतकार :- वैरामुत्तु 

          याआधी मी जे तमिऴ गाणे अनुवादित केले होते तेदेखील वैरामुत्तु सरांचेच होते. "गुलज़ार-रहमान "ही जशी हिंदीत नावाजलेली जोडी आहे तशीच "वैरामुत्तु-रहमान " ही तमिऴमध्ये नावाजलेली आहे. अगदी काल-परवापर्यंत या गाण्याचा अनुवाद करायचा विचार डोक्यात नव्हता. हपिसातल्या एका मित्राने म्हटले की त्याला तमिऴ समजत नाही, पण हे गाणे खूप आवडते, अर्थ जाणून घ्यायला आवडेल.म्हणून मग मी हा अनुवाद हाती घेतला. सुंदर कविता आहे.जर तुम्हाला हे गाणे आवडले नाही तर तो दोष माझा,माझ्या अनुवाद-क्षमतेचा, वैरामुत्तु सरांचा नव्हे. 


माझी कविता कुठेय ?
लिहून स्वप्नात दूमडून ठेवलेली कविता..
डोळ्यांत विरघळली ती ?
की सूर्योदयाने नष्ट केली ती ?
कविता शोधा हो माझी किंवा
स्वप्न परत करा माझे

संधीकाली हरवलेला,मनाच्या गल्लीत...
एक चेहरा शोधतोय मन माझे
डांबरी रस्त्यावर शहरात भटकतांना
फुलच ते, कोमेजते मन माझे
मेघांतून कोसळणार्‍या दोन थेंबांत
तुलाच शोधतेय मन माझे
पाण्यावर फुटणार्‍या बुडबुड्यांतही
कासाविस शोधतेय मन माझे

सुंदर चेहरा तुझा एकदाच पहिल्यावर
शांत होईल रे मन माझे
तुझ्या बोटाच्या अग्राने स्पर्श कर मला
अन्‌ हजारदा पुनर्जन्म घेईन मी.


चंद्रकोर येईल,
चंद्र येईलच पाठोपाठ
मन आनंदाने उड्या मारेल..
सावली दिसेल  एक,
तूच असशील या विचाराने
हृदय उचंबळेल...

माझी कविता कुठेय ?
लिहून स्वप्नात दूमडून ठेवलेली कविता..

एकच कटाक्ष , एकच शब्द, एकच स्पर्श
मागत आहे रे हे मन.
चुंबन घेतांना जाणवणारी
तुझ्या श्वासाची उष्मा
हवी आहे त्याला.
तुझ्या घामेजलेल्या शर्टाला बिलगण्याची,
वाट बघते माझे मन
तुझ्या खुरट्या दाढीने बोचायला
अधिर आहेत माझे गाल

ऐकत आहे....

पाषाणाचे आहे मन माझे,
मैत्रीणीला सांगितले होते......
दगडांच्या भेगांमध्ये उमलणार्‍या रोपट्यासारखे,
तू माझ्या मनात मूळ धरलेस

 माझी कविता कुठेय ?
लिहून स्वप्नात दूमडून ठेवलेली कविता..

५ टिप्पण्या:

 1. वाह संकेतानंदा,
  मावशीबोलीतल्या अशा उत्तमोत्तम रचना आणत राहा मातृभाषेत! :)

  उत्तर द्याहटवा
 2. संकेतानंद! खूपच आवडली कविता! त्या आधी तुम्ही म्हटल्याप्रमाणे गुलजारजींची आठवण नक्कीच होते कविता वाचताना. अप्रतिम! खरंच आणखीही रचना आणा मराठीत.

  उत्तर द्याहटवा
 3. मस्तच रे!
  मला काही शब्द कळतात म्हणून मज्जा येत आहे :)

  उत्तर द्याहटवा
 4. Hi Sanket, really loved your translation and asked a friend who knows Tamil for this song. Listened this song several times yesterday, I know no Tamil, but tried to feel it with your translation. Thanks for introducing us with Vairamuthu sir, and keep it up :)

  उत्तर द्याहटवा

Share

Twitter Delicious Facebook Digg Stumbleupon Favorites More