पोस्ट्स

मार्च, २०१२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

काही चारोळ्या - १

कधी काळी सहजच लिहील्या गेलेल्या ह्या चारोळ्या... पहिली वगळता इतर सर्व बझ्झवर टाकल्या होत्या.  १ ) त्याचे नशीब माझे असते तर बरे झाले असते दगडावरची रेघ खोडणे एवढे पण सोपे नसते   २) तुझ्या त्या आठवणी, तुझे ते भास.. रखरखत्या वाळवंटी , मृगजळाचे आभास.. कधी दचकून उठावे, रात्री अवचितच.. तूच निजलीस शेजारी, खोटा ठरतो विश्वास..   ३) सावध असतो मी , आता स्वप्न बघतांना  स्वप्नातली तू , काल प्रत्यक्षात दिसलीस.... माझ्या बंद पापण्यांच्या कैदेतून गं तू  कशी काय फरार झालीस ?   ४) सारेच बंध तोडून ये.. अशी धाव सैरभैर ये.. रातीला कवेत घेतो मी.. चांदण्यांना लपेटून ये..   ५) काळोखाच्या सावलीत... उदास कुजबूज... काजव्यांच्या ओठी.. चांदण्यांचे गुज..    ६) रक्तिम क्षितिजावर.... स्वप्न उदयास आले.. पंखातील चैतन्य.. आसमंत झाले...  

निसर्गाशी एकरूप होतांना - ठाकुरांचे ’आकाश भॉरा शूर्जो तारा ’

इमेज
आपण या निसर्गाचा एक भाग आहोत ही जाणीव जेव्हा होते तेव्हा मनात नेमक्या कोणत्या भावना येतात ? निसर्गाच्या सौंदर्याचा आविष्कार जेव्हा अनुभवतो, तेव्हा मन कसे पाखरू होते ना ?    रबिंद्रनाथ ठाकूरांचे ’आकाश भॉरा शूर्जो तारा ’ हे असेच एक सुंदर गीत. निसर्गात रोजच घडणार्‍या गोष्टींकडे बघण्याची एक नवीच दृष्टी इथे आपल्याला दिसते. निसर्गाच्या विविध रूपांत आपले स्थान गवसल्यावर उचंबळून येणार्‍या भावना गुरुदेवांनी सहजसोप्या आणि गेय शब्दांत गुंफ़ल्या आहेत. शेवटच्या ओळी तर हा ’स्वत्वा’चा साक्षात्कार अगदी अचूक पकडतात. " कान पेतेछी, चोख मेलेछी, धॉरार बुके, प्राण ढेलेछी जानार माझे ओजानार कोरेछी शोंधान " एकदा का स्वत्वाचा साक्षात्कार झाला की नेहमीच्याच ओळखीच्या गोष्टींकडे बघण्याचा दृष्टीकोण बदलतो आणि मग सुरु होतो ज्ञातांमधल्या अज्ञातांचा शोध.. या गीताचा मी माझ्या परीने मराठीत अनुवाद करायचा प्रयत्न केला आहे. या प्रयत्नात मला मोलाच्या सूचना देणार्‍या सविताताईंचे आभार.                आधी मूळ बांग्ला गीत : आकाश भॉरा शूर्जो तारा बिश्शो भॉरा प्रान ताहारी मा