पोस्ट्स

फेब्रुवारी, २०१६ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

विडंबन- जालाचे भामटं

जालाचे भामटं माझे घरीं प्रकटले। अवघेचि जालें पैसे गुल।। १।। साईटीचे कपट करुनी फसवलें अकाउंट देखिलें भागाकार गे माये।।२।। रोज बसून पूनम बारू सहज 'नीटु' प्याला। कधी ढोसियला खंबाकारे।।३।। -- स्वामी संकेतानंद, १७ फ़ेब्रुवारी, २०१५

लसणाचे आक्षे

इमेज
लागणारे साहित्य:- तांदूळ, लसणाच्या पाती, जीरे, हिरवी मिर्ची, टोमेटो, कोथिंबीर, चवीपुरते मीठ कृ्ती:- पावशेर(२५० ग्राम) तांदूळ 3-4 तास पाण्यात भिजवायचे. मुठीत येतील एवढ्या छान कोवळ्या, लांबसडक लसणाच्या पाती घ्याव्या. बारीक चिरून साधारण 20-30 मिनिटे पाण्यात भिजवावे. आता भिजलेले तांदूळ, लसणाची चिरलेली पात, थोड़ी कोथिंबीर, हिरवी मिर्ची, एक टोमेटो, आणि चमचाभर जीरे, चवीपुरते मीठ हे सगळे एकत्र करायचे आणि मिक्सरमध्ये थोड़े पाणी टाकून वाटून एकजीव करायचे. बॅटर साधारण डोशाच्या बॅटरएवढे गाढ असावे. तव्यावर थोड़े तेल शिंपडून एकसर पसरावे. त्यावर बॅटर गोल पसरावे. (त्याआधी तव्याखालची गॅस नक्की पेटवा आणि तवा गरम होऊ द्या.) पसरताना फार जाड पसरवू नये आणि फार पातळही नको. पातळ असेल तर तव्याला चिकटेल आणि जळेल. जाड झाले तर वरची बाजू शिजणार नाही. तव्यावर झाकण ठेवावे. गॅस मध्यम आचेवर असावी. साधारण 2-3 मिनिटांनी झाकण काढावे. परत आक्ष्यावर थोडे तेल सोडावे. आक्षे उलटून 20-30 सेकण्ड भाजावे. तव्यावरुन काढून तूप ओढून चटणी किंवा लोणच्यासोबत गरमागरम हादडावे. तांदळाचे पीठ झाले कमी:- आदर्श आक्षे:- उलट बाजू