अभियांत्रिकीला येणार्या सगळ्याच विद्यार्थ्यांना संगणकाचे ज्ञान असतेच असे नाही. काही दुर्गम भागातून आलेल्या विद्यार्थ्यांनी कधी संगणक पाहिलादेखील नसतो. असाच एक दुर्गम भागातून आलेला मुलगा माझ्या शाखेत (c.tech ) होता. बेट्याने पहिल्यांदाच संगणक बघितलेला, वर त्याच्या दादाने त्याला वापरायला म्हणून ल्यापटॉप घेऊन दिला. आता मित्र जे सांगतील ते तो करायचा. एक म्हणाला, "अरे ल्यापटॉप खूप नाजूक असतो, कीबोर्ड आणि माउस लवकर बिघडतात. तू वेगळे कीबोर्ड-माउस घे." त्याचे रुमीज महाचोर वगैरे प्रकारातले होते. त्यांनी सल्ला दिला, " अरे आपण माउस कॉलेजातून आणूया. कीबोर्ड आणता येणार नाही म्हणून नाईलाज आहे. तो तू विकत घे." झालं, पठ्ठ्याने ह्या कामी माझी मदत घ्यायचे ठरवले, कारण मी त्याचा चांगला मित्र होतो. मी: अबे १५०-२०० येते माउस, चल धंतोली,आणू आपण आताच. तो: अबे आपल्या ल्याबमधून कोणी-न-कोणी माउस चोरतच राहतो. काही मोठी गोष्ट नाही. कायले पैसे खर्च करू मी? उद्या आणू ल्याबमधून ढापून. आपण प्रॅक्टिकल संपले, सगळे गेले की एक माउस चोरू. मी: अबे, कोणी पाहिले तर वांदा होईल ना बे . तो:...
आतापर्यंत कोणी टिप्पण केले नाही म्हणून वाईट वाटून घेऊ नकोस.भागवानाके घर देर है,अंधेर नही है.एकदम झकास.
उत्तर द्याहटवाधन्यवाद! :)
हटवा