तो राजा आमच्याच जातीचा......
जुनी गोष्ट आहे. शेकडो वर्षं जुनी. भारतवर्षात एक राजा होता. राजा पराक्रमी होता, कलेचा भोक्ता होता, रसिक होता, त्याच्या दरबारी कलाकारांना, साहित्यिकांना मानाचे स्थान होते. राजा स्वतः एक साहित्यिक होता, प्रकांडपंडित, विद्वान होता.आपल्या पराक्रमाने त्याने आपल्या राज्याचा विस्तार केला.सुख-समृद्धीचे राज्य आणले. त्याच्या राज्यात भरभराट होती,प्रजा सुखी होती. वर्षामागुन वर्षं गेलीत. राजा आता दंतकथेचा, लोकसाहित्याचा विषय झाला होता.त्याच्या पराक्रमाचे पोवाडे गायले जाऊ लागले. त्याची महानता अधोरेखित करणार्या म्हणी निघाल्या.त्याच्या काळातल्या वास्तूंना तिर्थक्षेत्राचे स्थान मिळाले राजा जाऊन शेकडो वर्ष झाली. आता विसावे शतक लागले होते."जात नाही ती जात" चा प्रत्यय येत होता. जाती तिथेच होत्या.महापुरुषांना जातीच्या दावणीला बांधण्याची नवी टूम निघाली. राजा कसा वाचणार! राजा ज्या जातीचा होता त्या जातीने राजावर आपला दावा केला. त्याच्या नावाने त्या जातीने संघटना उभारल्या. सम्मेलने भरू लाग...