पितृपक्ष स्पेशल विडंबन- आम्ही कोण

पितृपक्ष स्पेशल विडंबन सादर करत आहे. आस्वाद घेणे.

आम्ही कोण म्हणूनि काय पुससी? आम्ही असू कावळे-
देवाने दिधले असे पिंड तयें आम्हांस शीवावया
विश्वी या पितराबले विचरतो चोहीकडे लीलया
त्रैलोकांतुनि आरपार अमुची दृष्टी पहाया वळे
सारेही बडिवार येथिल पहा! आम्हांपुढे ते फिके;
काकस्पर्शच आमुचा शकतसे पिंडांप्रती द्यावया-
मोक्षातिशया, अशी वसतसे जादू बिलांमाजि या;
पापे वाढविता तुम्ही, बदलितो ते भाग्य आम्ही फुके!
स्वर्गामाजि वसाहती वसविल्या कोणी नरांच्या बरे?
नर्काला मनुलोक साम्य झटती आणावया कोण ते?
ते आम्हीच, सुधा कृतींमधुनिया ज्यांच्या सदा पाझरे;
ते आम्हीच पितर, मंगल तुम्हां ज्यांपासुनी लाभते!
आम्हांला वगळा- गतप्रभ झणी होतील मोक्षांगणे
आम्हांला वगळा- थकाल पितरांची फेडिता ती ऋणे!

-- स्वामी संकेतानंद,
नवी दिल्ली,
११/०९/२०१४

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Share

Twitter Delicious Facebook Digg Stumbleupon Favorites More