विडंबन - अशी कबुतरे येती

अशी कबुतरे येती;
आणिक घाण ठेवुनी जाती
दोन घरांची पुण्यकमाई
दहा घरांच्या खाती
कपोत आला, पहिला वहिला
खिड़कीमागे उभा राहिला
तया मागे, येई साजणी
गूटर्गूच्या साथी...
दुरून येती थवे देखिले
मी ग्याल्रीचे दार लोटिले
धड़क मारती तरी निरंतर
गंधित झाल्या भिंती
पंख दोन ते हळु फ़डफ़डले
खोलीभर मायेने फिरले
हॉलकिचनाच्या भिंतीमधुनि
लागेना मज हाती
'पुण्यवान' तो येता गाठी
शिव्या पाच मोहरल्या ओठी
त्या तुटल्या दातांची गाथा
क्रूर कबुतरे गाती

-- स्वामी संकेतानंद,
१५ ऑक्टोबर, २०१३,
नवी दिल्ली

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

निबंध :-- माझे आवडते पक्वान : हलवा

'मर्ढेकरांची कविता' : बेकलाइटी नव्हे, अस्सल !

काही चारोळ्या - १

माउस पाहावे चोरून !

द ग्रीन फ़्लाय