श्रावणमासी हर्ष-मानसी

माझ्या लाडक्या कवींच्या, बालकवींच्या ’श्रावणमासि हर्ष मानसी’ या माझ्या आवडत्या कवितेचे हे विडंबन त्यांची क्षमा मागूनच सादर करत आहे.


श्रावणमासी हर्ष-मानसी, फिरायला जाती सिंहगडी
रुटीन चूकवून,बाईक दामटून,वाट करती वाकडी

विकेंड बघता ओघ गाड्यांचा गडावरी चाललासे
जत्रा भरली काय गडावरी, क्षणोक्षणी मज भासे

झालासा सूर्यास्त वाटतो, क्यामेरा त्वरेने तो काढे
तानाजी कड्यावर पोज दिली, फ़ोटो काढा ना गडे

उठती वरती जलदांकडे पाहण्यास वेळ नसे
सर्व प्रेयसीवर होय रोखिले क्यामेर्‍याची लेन्से

दुकानमाला दिसता भासे शॉपिंग कॉम्प्लेक्स इथे
चढूनि येती गडावरती, खादाडीस की एकमते

कचरा करूनि प्लास्टिकचा गडावरी वावरती
सुंदर ललना हिरव्या कुरणी मित्रासंगे बागडती

पार्ट्याही होती रानी, डीजे आसमंती घुमे
फ़ेसाळ पेला बोले, हवी कशाला परमिट रुमे

व्हिस्की कॅन उघडला विपिनी,धुंद गंध दरवळला
बघता तिथे पोलिसमामा, मन अति कळवळला

महागडी गाडी घेऊन साथी घाटावरूनि चढती
आले मनी, निघाले झणी,गोंधळ घालाया वरती

गडदर्शना निघती ललना, हर्ष येई कराया क्लिक
वॉलवर त्यांच्या बघून घ्यावे, श्रावण महिन्याचे ’पिक’


---पुणे,
२ ऑगस्ट, २०१२

९ टिप्पण्या:

 1. नेहमीप्रमाणे भारी नाही झाली, चांगली जमलीये :)

  उत्तर द्याहटवा
  प्रत्युत्तरे
  1. मला विनोदी लिहायची नव्हती, औपरोधिक लिहायची होती, म्हणून असेल कदाचित. :)

   हटवा
 2. गडावर जर महाराज खरच फिरत असते ....तर हे सर्व पाहून त्यांना काय वाटेल ह्याचा विचार करवत नाही ना!

  उत्तर द्याहटवा
  प्रत्युत्तरे
  1. खरे आहे अगदी.
   गडावर गड बघायला न जाता फालतूची थेरं करायला जाणारी टोळकी पाहिल्यावरच हे विडम्बन सुचले होते.

   हटवा
 3. महाराज नाहीत आणि बालकवीही नाहीत हेच बरं आहे :-(

  उत्तर द्याहटवा

Share

Twitter Delicious Facebook Digg Stumbleupon Favorites More