१२ रजनीचित्रपट व्रतकथा - २
जुनी गोष्ट आहे. एक आटपाट नगर होते.लुंगीनगर त्याचे नाव.त्या नगरात एक बस वाहक राहायचा. सगळे त्याला चिदूअण्णा म्हणायचे. खाकी सदरा, खाली पांढरी शुभ्र सुती लुंगी, गळ्यात बांधलेला लाल रुमाल, डोळ्यांवर चढवलेला काळा गॉगल ही त्याची वेशभुषा होती.तो रजनीदेवाचा भक्त होता. तो त्याच्या व्यवसायात आनंदी होता. पण त्याला सुटे पैसे परत मागणार्या प्रवाशांचा फार त्रास होता.त्यांच्यासोबत वाद घालतांना प्रकरण कसे निस्तरावे कळेनासे झाले होते. त्याचा हिशोब बरोबर लागत नसे. सुट्या पैशांची कमतरता त्याला हैरान करी. प्रवासी पण त्याचे ऎकेनात.
एके दिवशी त्याला एका सहकार्याकडून "१२ रजनीचित्रपट व्रताची" माहिती झाली. सहकार्याने सांगितले की, हा व्रत केल्यास तुझ्या सर्व मनोकामना पूर्ण होतील. मग त्याने व्रताची विधी समजावून सांगितली. सोबतच त्याला एक चेतावनी दिली की, हा व्रत मनोभावे पूर्ण कर, देवाजींना विसरू नकोस. " उतू नको, मातू नको, घेतलेली dvd टाकू नको. " इतके बोलून सहकारी आपल्या मार्गाला लागला.
चिदूअण्णाने ठरवले की, आपण हा व्रत करायचा. १२ जुलै ला त्याने व्रताला प्रारंभ केला. तो अगदी मनोभावे व्रत करी.त्याने रजनीदेवाच्या व्रतात कुठलीही कमी पडू दिली नाही. जसेजसे दिवस पुढे सरकत होते तसतसे चिदूअण्णाला व्रताचा प्रत्यय येऊ लागला.आतातर बसमधे कमालच व्हायची. आता तो बसमधे अगदी खुल्या आवाजात म्हणायचा ," ऎ, किसके पास चिल्लर नही है ?? उनको बस से उतर जाना.. Mind it.. I say.." आणि प्रवासीसुद्धा उतरून जायचे. जे प्रवासी दीडशहाणपणा करून सुटे पैसे लपवायचे, चिदूअण्णाने " रजनीकांतजी के नामसे एक बार फिर बोलता.. Mind it, I say.." असे म्हणायचा अवकाश की ते सुटे पैसे आपोआप बाहेर उड्या मारत चिदूअण्णाच्या खिशात जायचे. सुट्या पैशांचा घोळ झाला की चिदूअण्णा देवाजींचे नाव घ्यायचा व देवाजींच्या स्टाईलमधे ५ चे नाणे हवेत उडवायच्या. हवेतच ५ च्या नाण्याचे ५ १-१ रुपयांच्या नाण्यांत बदलायचे आणि बरोबर त्याच्या मुठीत यायचे.
असे कितीतरी ’न भूतो न भविष्यती’(अर्थात, देवाजींकरता रोजचेच) चमत्कार चिदूअण्णा करू लागला. हे चमत्कार बघायला त्याच्या बसमधे जास्तच गर्दी होऊ लागली. चिदूअण्णामुळे देवाजींच्या भक्तसंख्येत प्रचंड वाढ झाली. त्याच्या बसने प्रवास करणार्या प्रवासांच्या संख्येतसुद्धा वाढ होऊ लागली. त्याच्या या कामगिरीसाठी त्याला " सर्वोत्कृष्ट वाहकाचा" त्या वर्षीचा राज्य पुरस्कार मिळाला.
"१२ रजनीचित्रपट व्रताचा हा महिमा बघून चिदूअण्णा भारावून केला. त्याचे आयुष्य समाधानी झाले. चिदूअण्णा पुढे ’चिदूबाबा’ नावाचेच जास्त प्रसिद्ध झाला.
"१२ रजनीचित्रपट व्रताचा हा महिमा बघून चिदूअण्णा भारावून केला. त्याचे आयुष्य समाधानी झाले. चिदूअण्णा पुढे ’चिदूबाबा’ नावाचेच जास्त प्रसिद्ध झाला.
"१२ रजनीचित्रपट व्रत " केल्याने जसे चिदूअण्णाचे कल्याण झाले तसेच श्रोत्यांचे होवो ही रजनीकांतदेवांच्या चरणी याचना.
अशी ही साठा उत्तराची कहाणी सुफळ सम्पूर्ण.
श्री रजनीकांताय नमः
रजनीकांतजींच्या नावाने..... MIND IT अण्णा !!!
तमिळप्रान्तस्वामी, सहस्रसूर्यप्रकाशित, कोटिहस्तबलाभुषित,सर्वयुद्धकलाविषारद, धुम्रदन्डिकाधारी, कृष्णनयनावरणउच्छालिता, अभिनयसम्राट, मनोरंजनदाता, भाग्यविधाता,तरुणातितरुण, चिरतरुण, देवाधिदेव, चित्रपटदेव, रजनिकांतदेवजीकी...... जय !!!!
धन्य झालो,ही व्रतकथा वाचुन...मस्तच रे....
उत्तर द्याहटवारजनिकांतजीच्या नावाने ....MIND IT अण्णा !!!
कथा वाचून संपताच, laptop मिटून मस्तकावर टेकवला.
उत्तर द्याहटवारजनी देवो भव:
धन्यवाद देवेन्द्रदा.....
उत्तर द्याहटवाधन्स रे आकाश....
हा रजनीभक्तीसंप्रदाय आपल्या सर्वांच्या प्रयासाने वाढतच राहो ही रजनीचरणी प्रार्थना !!!