चेहरे

आश्वासनास भुलले चेहरे
काळोख पीत निजले चेहरे
हातात आंधळ्यांच्या, बंदुका..
रक्तात हाय, भिजले चेहरे!
त्यांची नज़र ढगांना बोचली
अन् वावरात रडले चेहरे
मी कळवळून गातो मर्सिया
अन् दाद देत बसले चेहरे
लिहतोस तू कुणासाठी गझल
त्यांचे कधीच थिजले चेहरे

-- संकेत,
नवी दिल्ली, 
३० ऑगस्ट , २०१५ 
--------------------------------------------------
आणि जाताजाता ग़ालिबच्या एका शेराचा अनुवाद:-
सगळेच काय दडले चेहरे?
काही फुलांत दिसले चेहरे
मातीत काय शोधीशी अता?
झाले विलीन, लपले चेहरे
मूळ शेर :-
सब कहाँ, कुछ लाल:-ओ-गुल में नुमायाँ हो गईं
ख़ाक में क्या सूरतें होंगी, कि पिन्हाँ हो गई

-- नवी दिल्ली,
१९ ऑगस्ट,२०१५ 

२ टिप्पण्या:

  1. खूप छान... तुमच्या कविता नेहमीच छान असतात पण कवितेवर दर वेळी काय प्रतिक्रिया द्यावी हे मला बऱ्याचदा समजत नाही.... :)

    उत्तर द्याहटवा

Share

Twitter Delicious Facebook Digg Stumbleupon Favorites More