हिरव्या कुरणांबाहेर


हिरव्या कुरणांबाहेर
बसले आहेत अजस्र देहाचे
अक्राळविक्राळ चौकीदार
भालेबंदुकातोफा घेऊन

हिरव्या कुरणांबाहेर
बुभुक्षित गुरांचा
आशाळभूत कळप
माती उकरून सुकलेल्या
गवतांच्या मुळ्या
खात आहे

हिरव्या कुरणाला आहे 
उंचच उंच
गंजलेले लाल काटेरी कुंपण

गंजलेल्या कुंपणावर चढण्याचा
प्रयत्न करत आहेत गुराखी
सोलवटलेल्या कातडीने

हिरव्या कुरणांत आपसूकच
खत वाहत येत असते
आणि हिरवी कुरणे
हिरवीकंच होत असतात

-संकेत

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

निबंध :-- माझे आवडते पक्वान : हलवा

'मर्ढेकरांची कविता' : बेकलाइटी नव्हे, अस्सल !

काही चारोळ्या - १

माउस पाहावे चोरून !

द ग्रीन फ़्लाय