विडंबन-- पडून आहे सार्त्र अजुनी
    पडून आहे सार्त्र अजुनी भावड्या निजलास का रे? एवढ्यातच त्या कम्यूवर तू असा थकलास का रे? अजुनही रचल्या न थप्पी रँडतैच्या पुस्तकांच्या अजुन ’भू’ खचली कुठे रे? हाय! तू खचलास का रे?    सांग, ह्या बाख्तीनदाच्या भाविकाला काय सांगू? नच कळे आम्हास ते जे आणि तू रुसलास का रे? बघ तुला पुसतोच आहे पश्चिमेचा फ़्रांत्स काफ़्का, ’रातपारीला बनूनी कीट वळवळलास का रे?’     उगवती डोक्यात माझ्या ’जागतिक’च्या पायवाटा  तू बिचार्या वाचकांना एवढा  छळलास का रे?    -- स्वामी संकेतानंद,    १४ नोव्हेंबर,२०१४,    नवी दिल्ली