रोमन लिपीत भारतीय भाषा
सध्या sms, e-mail आणि social networking च्या युगात आपण आपल्या मातृभाषेत लिहायला रोमन लिपीचा सर्रास वापर करतो.जवळपास सर्व भारतीय भाषा या उच्चारानुसार लिहिल्या जातात. त्यामुळे आपण रोमन लिपीत लिहिताना आपल्या भाषेतील उच्चारांप्रमाणेच लिहीत असतो. किमान मराठी,हिंदी आणि गुजराती भाषा तरी हा संकेत पाळत असतात. रोमन लिपीत लिहितांनाचे काही अलिखित नियमच बनलेले आहेत. उदा.- bha-- भ, ta --- त/ट, la -- ल/ळ, d -- द/ड, th-- थ/ठ, dh -- ध/ढ, इ. वरील नियम मराठी, हिंदी व गुजराती भाषिक म्हणजेच जवळजवळ ५०% भारत पाळत असल्याने संपूर्ण भारतात याच पद्धतीने लिहीले जात असेल असा समज न झाल्यास नवलच. मात्र कित्येक भारतीय भाषांमध्ये काही शब्द लिहिण्याची वेगळीच पद्धत पाळली जाते. ती आपल्याला माहित नसल्याने अशा भाषेतील मजकूर किंवा नाव किंवा त्या भाषिक व्यक्तीने पाठवलेला संदेश वाचताना बरेचदा आपली गफलत होते. ती टाळण्यास मदत करावी हा या लेखाचा हेतू आहे. पहिले उदाहरण आहे बांग्ला/बंगाली भाषेचे. बांग्लामध्ये ’भ...