रोमन लिपीत भारतीय भाषा

सध्या sms, e-mail आणि social networking च्या युगात आपण आपल्या मातृभाषेत लिहायला रोमन लिपीचा सर्रास वापर करतो.जवळपास सर्व भारतीय भाषा या उच्चारानुसार लिहिल्या जातात. त्यामुळे आपण रोमन लिपीत लिहिताना आपल्या भाषेतील उच्चारांप्रमाणेच लिहीत असतो. किमान मराठी,हिंदी आणि गुजराती भाषा तरी हा संकेत पाळत असतात.
    रोमन लिपीत लिहितांनाचे काही अलिखित नियमच बनलेले आहेत.
उदा.- bha-- भ, ta --- त/ट, la -- ल/ळ, d -- द/ड, th-- थ/ठ, dh -- ध/ढ, इ.
    वरील नियम मराठी, हिंदी व गुजराती भाषिक म्हणजेच जवळजवळ ५०% भारत पाळत असल्याने संपूर्ण भारतात याच पद्धतीने लिहीले जात असेल असा समज न झाल्यास नवलच.
    मात्र कित्येक भारतीय भाषांमध्ये काही शब्द लिहिण्याची वेगळीच पद्धत पाळली जाते. ती आपल्याला माहित नसल्याने अशा भाषेतील मजकूर किंवा नाव किंवा त्या भाषिक व्यक्तीने पाठवलेला संदेश वाचताना बरेचदा आपली गफलत होते. ती टाळण्यास मदत करावी हा या लेखाचा हेतू आहे.
    पहिले उदाहरण आहे बांग्ला/बंगाली भाषेचे.
   
    बांग्लामध्ये ’भ’ करिता  ' v ' लिहितात. आपण मात्र ’ व ’ करिता 'v' वापरत असतो. बांग्लामधे ’व’ नसल्याने त्यांची कसलीही तारांबळ उडत नाही. त्या भाषेत ’ब’ च आहे. आठवा आता आपला सौरव (saurav) गांगुली. सौरव चा काही अर्थ आहे का हो? आता तेच सौरभ असे वाचा. लागला अर्थ! बांग्लामधे ’व’ नसल्याने ’सौरव’ नाव शक्यच नाही. अजून एक उदाहरण amitav ghosh हे आहे. आपण amitabh लिहीतो ते amitav लिहितात.

    बांग्ला मधे पुल्लिंगी विशेषनाम रोमन लिपीत लिहितांना खालीलप्रमाणे लिहितात.
  sudipta -- शुदिप्तो,
  prasanta -- प्रशांतो
  diganta --  दिगंतो, इ...
      आपण मात्र वाचताना सुदिप्ता, प्रसांता (प्रसंता) आणि दिगंता असे वाचतो. Sengupta हे बंगालीत शेनगुप्तो !

    आता दाक्षिण्यात्य भाषा.
    तमिळ आणि मलयाळम  भाषा वाचताना आपली सर्वाधिक गफलत होते कारण या भाषांचे नियम भयंकर वेगळे आहेत.

th -- त/ द (थ,ठ नाही)
dh --- द (ढ, ध नाही)
उदा. -- alaipaayuthey -- अलैपायुदे
          kaNNathil -- कण्णती
          sangitham-- संगी
          devnathan -- देवना
            kaadhal -- का
l -- ल
L --  ळ/ ़ल( हा ल मराठीत नाही)
zh -- (हा सुद्धा मराठीत नाही)
उदा.--- kaadhal -- कादल
         manjaL -- मंज़ल
         ponaaLo -- पोनाळो, avaL -- अवळ
         azhagiri( केंद्रिय मंत्री) == अगिरी,  alapuzha(kerala's  tourist place) -- अलपुऴा, mazha -- मऴा

ennodu हा शब्द एन्नोडं असा वाचावा ( हा नियम u ने संपणार्‍या जवळ्पास सर्व शब्दांना लागू होतो)  vandhu --- वन्दं

d-- ड
t -- ट
n -- न (naan -- नान)
N-- ण (kaNNir --- कण्णीर)

 अजून एक गंमत.
  ' s ' चा उच्चार ’च’ सुद्धा होतो आणि ’’ सुद्धा होतो.
  एक तमिळ गाणं आहे---
" Suttum vizhi sudare " -- सुट्टूम विऴी चुडरे
    एकाच ओळीत  's'  कसा दोन प्रकारे वापरलाय बघा.

  p  शब्दाच्या सुरुवातीला आला तर ’प’ आणि मधात आला तर ’ब’ होतो.

po -- पो,  poovai -- पूवई
kopam --- को

nj --   ( njaan --ञान, njaabagam -- ञाबघम)
अजूनही काही नियम सुटले असावेत. ते पुन्हा कधीतरी.
आता तमिळ( खरे तर तमि) गाण्यांच्या रोमन लिपीत लिहिलेल्या lyrics  तुम्हाला सहज वाचता येतील; आणि बंगाली नाव वाचतांना गडबड होणार नाही.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Share

Twitter Delicious Facebook Digg Stumbleupon Favorites More