भेटूया ब्रेक के बाद
आता कदाचित ३ महिने तरी मी लिहिणार नाही. अगदी प्रणच केलाय तसा मी. फार धकाकीचे, धावपळीचे, त्रासाचे, तणावाचे,जे जे वाईट प्रकारात मोडते तश्या प्रकारचे जीवन जगावे लागणार आहे मी या तीन महिन्यांत. त्यामुळे लिहायला वेळच मिळणार नाही. कदाचित मी मार्चपासून परत लिहिणे चालू करेन. आणि हो, मी इतर ब्लॉग्स पण वाचणार नाही, त्यामुळे माझ्या प्रतिसादला तुम्ही मुकणार खरे! मी परत आल्यावर सगळा कोटा पूर्ण करायचा प्रयत्न करेन.तीन - सव्वातीन महिन्यांत ब्लॉगविश्वात किती बदल होतात ते बघणे मजेदार ठरेल. आपल्या शुभेच्छा घेऊनच जायचा विचार आहे.विसरू नका मला! ;) जाता जाता एक चारोळी लिहूनच जातो,सॉरी येतो ! ;) वाटेवरल्या सावल्या, मला विचारत्या झाल्या, ...