भेटूया ब्रेक के बाद

     आता कदाचित ३ महिने तरी मी लिहिणार नाही. अगदी प्रणच केलाय तसा मी. फार धकाकीचे, धावपळीचे, त्रासाचे, तणावाचे,जे जे वाईट प्रकारात मोडते तश्या प्रकारचे जीवन जगावे लागणार आहे मी या तीन महिन्यांत. त्यामुळे लिहायला वेळच मिळणार नाही. कदाचित मी मार्चपासून परत लिहिणे चालू करेन. आणि हो, मी इतर ब्लॉग्स पण वाचणार नाही, त्यामुळे माझ्या प्रतिसादला तुम्ही मुकणार खरे! मी परत आल्यावर सगळा कोटा पूर्ण करायचा प्रयत्न करेन.तीन - सव्वातीन महिन्यांत ब्लॉगविश्वात किती बदल होतात ते बघणे मजेदार ठरेल.
  आपल्या शुभेच्छा घेऊनच जायचा विचार आहे.विसरू नका मला! ;)
  जाता जाता एक चारोळी लिहूनच जातो,सॉरी येतो ! ;)

                     
वाटेवरल्या सावल्या,
                      मला विचारत्या झाल्या,
                      माहीत आहे का तुला,
                      कोणी सोडले आम्हाला ?

  
चला तर मग,राम राम!! रजनी रजनी !! भेटूच!!
            
                      

५ टिप्पण्या:

 1. संकेतानंद,
  सुरूवात आहे आत्ता एका नव्या आयुष्याची...
  रस्त्यावर लागतील वळणे अजूनी...
  पण प्रत्येक वळणावर अन् प्रत्येक थांब्यावर...
  उभा सापडेल भगवान रजनी!! :D

  उत्तर द्याहटवा
 2. विभि +१

  संकेतानंद,
  खूप खूप शुभेच्छा..वाट बघतोय आपली स्वामी परत येण्याची..
  तोवर रजनी रजनी :)

  उत्तर द्याहटवा
 3. स्वामी, शुभेच्छा !!

  ब्लॉगमधून ब्रेक घेताय ते ठीके पण रजनीदेवाची रोजची पूजाअर्चा चालू राहू द्या बरं ;)

  उत्तर द्याहटवा
 4. स्वामी रजनिदेवाची कृपादृष्टी आहे तुझ्यावर..
  आणि बाबा काय कमालची ओवी लिहली आहेस... व्वाह...

  उत्तर द्याहटवा
 5. स्वामी पण तुम्ही केलात आणि माझ्याकडूनही काही लिहण जहाल नाही इतक्या दिवसात ब्लॉगवर ....या लवकर या ....

  उत्तर द्याहटवा

Share

Twitter Delicious Facebook Digg Stumbleupon Favorites More