’सोपा’ उपाय ??

’फुकट ते पौष्टिक ’ च्या ’ पिपा ’ सेला आळा घालणारा ’ सोपा ’ उपाय आंतरजालामुळे माहितीची देवाणघेवाण करणे जितके सहज - सुलभ झाले तितके याआधी कधीच नव्हते . ’ माहिती ’ च्या व्याख्येखाली चित्रपट , संगीत , पुस्तके , लेख , संशोधन प्रबंध सारेच आले . माहितीचा मुक्त स्रोत ही आंतरजालाचे नवी ओळख बनली . ’ फ़ुकट ते पौष्टिक ’ आणि ’ जे जे आवडे आपणाला , ते ते द्यावे मित्रांना ’ म्हणत जालावर कॉपीराईटेड माहितीच्या अपलोडिंग - डाउनलोडिंगचा सिलसिला सुरू झाला . पिअर - टू - पिअर शेअरिंगच्या तंत्रज्ञानाने तर क्रांतीच आणली . टॉरेंट संकेतस्थळांचा सुळसुळाट झाला . जागतिक चित्रपट , आजोबांच्या तोंडून फ़क्त ऐकलेले त्यांच्या काळातले चित्रपट , जुन्या मालिका सगळे टॉरेंट्सच्या माध्यमातून सहज मिळू लागले . शेकडोंनी असलेल्या संगीत - संकेतस्थळांमुळे हवी ती गाणी हव्या त्या वेळी ऐकण्याची , डाउनलोड करून संग्रही ठेवण्याची सोय झाली . इ - बुक्स डाउनलोड करून लोकांनी आपली वाचनाची भूक भागवण...