रजनीकांतची आरती - मराठी

प्रात:स्मरणीय आदरणीय रजनीकांतदेव तमिळप्रांतीय चित्रपट-उद्योगाद्वारे आपल्या लीला दाखवून मर्त्य मानवास धन्य जरी करत असले तरी ते मूळचे आपले मराठे माणूसच (हो हो.. शिवाजीराव गायकवाडच..), त्यांचा भक्तवर्ग हा मराठी मुलुखातदेखील असल्याची जाणीव या पामरास आहे, म्हणूनच आम्ही रजनीकांतदेवजींची आरती मराठीमध्ये लिहावयास घेतली.. रजनीकांतदेवजींच्या प्रेरणेनेच ही आरती लिहीली जात आहे..हा त्यांचाच कृपाप्रसाद.... गोड मानून घ्या..

 

आरती रजनीकांता,
महातेजस्वी संता,
रक्षिले भक्तगण,
असा तू अरिहंता
आरती रजनीकांता ॥१॥

सिगरेट भिरकावली,
ओठी अलगद झेलली,
गॉगल्सची केली भिंगरी,
दुष्टांची त्रेधा उडाली ॥२॥
आरती रजनीकांता...

सहस्त्र गुंड भारी,
एका बोटाने मारी,
यमाला मात दिली,
तू आमचा कैवारी ।३॥
आरती रजनीकांता...

सोकावले सिनेतारे,
चैतन्यमय तू उभा रे,
तरुणांचा आदर्श आणि,
पिडीतांचा अण्णा रे ॥४॥

आरती रजनीकांता...

चित्रपट तुझे बघावे,
दु:ख घरी ठेवावे,
तुझेच नाम ओठी,
ध्यानीमनी जपावे ॥५॥

आरती रजनीकांता...

सांगावी किती आता,
तुझी पराक्रम गाथा,
संकेत भक्त तुझा,
चरणी ठेवितो माथा ॥६॥
आरती रजनीकांता,
महातेजस्वी संता,
रक्षिले भक्तगण,
असा तू अरिहंता
आरती रजनीकांता...


रजनीकांतच्या नावाने.....  MIND IT  अण्णा  !!!

तमिळप्रान्तस्वामी, सहस्रसूर्यप्रकाशित, कोटिहस्तबलाभुषित,सर्वयुद्धकलाविषारद, धुम्रदन्डिकाधारी, कृष्णनयनावरणउच्छालिता, अभिनयसम्राट, मनोरंजनदाता, भाग्यविधाता,तरुणातितरुण, चिरतरुण, देवाधिदेव, चित्रपटदेव, रजनिकांतदेवजीकी...... जय !!!!

टिप्पण्या

  1. लगेच मी पण माझा कार्यक्रम बदलतो! आधी जो १० दिवसांचा रजनीकांत बसवणार होतो, तो आता १२ दिवसाचा बसवू!!
    रूम वर एक रजनीकांतचा 6 फुटी पोस्टर चिटकवून प्राण-स्थापना करतो!

    मी पण एक व्रत ठेवणार आहे. हे सगळं पोथी-स्वरुपात छापून, दर महिन्याच्या १२ तारखेला - १२ युवकांना वाटीन!


    JO MAANE RAJNI DEVA, USSE MILEGA KOLLYWOOD KA MEWA!!

    उत्तर द्याहटवा
  2. जब्ब्ब्ब्बर्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्दस्त....

    उत्तर द्याहटवा
  3. आयला हि हिंदीपेक्षा भारी जमली आहे बघ :)
    आकाशच्या ब्लॉगवर हिंदी मधील वाचली आहे
    रजनी MIND ITT :)

    उत्तर द्याहटवा
  4. खुपच मस्त..अगदि चालीसकट वाचली....

    उत्तर द्याहटवा
  5. @ above all: आपल्या प्रतिसादाबद्दल आभारी आहे.

    उत्तर द्याहटवा
  6. क्या बात है! क्या बात है! अगदी ‘आरती साईबाबा’ ची चाल आहे. मस्तच. मीही बसवेन म्हणतो रजनीकांत पुढच्या वर्षापासून.

    उत्तर द्याहटवा
  7. अरे पुढच्या वर्षी कशाला ?? याच वर्षी बसव !!! १२ डिसेम्बरला !!! "शुभस्य शीघ्रम " !!!

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

निबंध :-- माझे आवडते पक्वान : हलवा

'मर्ढेकरांची कविता' : बेकलाइटी नव्हे, अस्सल !

काही चारोळ्या - १

माउस पाहावे चोरून !

द ग्रीन फ़्लाय