त्रिवेणी क्र. १ --
रस्त्यावर उडणारा धुरळा..
आणि माणसांचा गोतावळा..
.
.
.
.
.
.अजून एक आत्मा आज मुक्त झाला
*********************************************
रस्त्यावर उडणारा धुरळा..
आणि माणसांचा गोतावळा..
.
.
.
.
.
.अजून एक आत्मा आज मुक्त झाला
*********************************************
त्रिवेणी क्र. २ --
कृष्णाला सांगा वस्त्र चोरु नकोस आता..
कृष्णाला सांगा मडके फ़ोडू नकोस आता..
.
.
.
.
.
महिला आयोग स्थापन झालाय ना आता ..
**************************************************
त्रिवेणी क्र. ३ --
मी तारे आणले असते तु्झ्यासाठी ..
मी नक्षत्र आणले असते तुझ्यासाठी..
.
.
.
.
पण तूच आकाशात जाऊन बसलीस ... :(
*************************************************
त्रिवेणी क्र. ४ --
यंदा काय ती कडाक्याची थंडी होती !
यंदा काय ते धुके गोठले होते !!
.
.
.
..
.
यंदा पिकांवर कीड पडली होती....
**********************************************
यंदा काय ती कडाक्याची थंडी होती !
यंदा काय ते धुके गोठले होते !!
.
.
.
..
.
यंदा पिकांवर कीड पडली होती....
**********************************************
त्रिवेणी क्र. ५ --
वर बघितले की नक्षत्रांची आरास किती सुंदर दिसते..
अंगाला स्पर्शणारी वार्याची झुळूक किती शीतल भासते..
.
.
.
.
झोपायला आजसुद्धा फ़ुटपाथच नशिबात आले..
वर बघितले की नक्षत्रांची आरास किती सुंदर दिसते..
अंगाला स्पर्शणारी वार्याची झुळूक किती शीतल भासते..
.
.
.
.
झोपायला आजसुद्धा फ़ुटपाथच नशिबात आले..
**********************************************
त्रिवेणी क्र. ६ --
चांदण्यांची शीतलता नशिबात नाही
रातराणीचा गंध नशिबात नाही
.
.
.
.
.
सूर्याने काय पाप केले होते, विचारावं त्यालाच !