मन वढाय वढाय...

बहिणाबाईंनी किती समर्पक शब्दांत मनाचे वर्णन केलंय..


    मन वढाय वढाय
    उभ्या पिकातलं ढोर
    किती हाकला हाकला
    फिरी येतं पिकावर


    मन मोकाट मोकाट
    याच्या ठाई ठाई वाटा
    जशा वार्‍य़ानं चालल्या
    पान्यावरल्या रे लाटा
(तमिळ कवी ऊदक्कडु वेंकटसुब्रमण्य अय्यर यांनीसुद्धा मनाला लाटांची उपमा दिलीय.. अलईपायूदे, कण्णा, एन मनम अलईपायूदे.( माझे मन उचंबळणार्‍या लाटांप्रमाणे आहे.)


    मन एवढं एवढं
    जसा खाकसंचा दाना
    मन केवढं केवढं ?
    आभायात बी मायेना


    मन नेमके असते कुठे हो? मेंदुच्या कुठल्यातरी कोपर्‍यात दडून बसलेलं ?? आणि क्षणभरही तिथं न थांबणारं !! मेंदू म्हणजे सतत विचार करणारी यंत्रणा. तरीसुद्धा आपण म्हणत असतो, "मी विचार नाही केला... मनात आलं ते केलं. " आणि हा पठ्ठा मन तर मेंदुतच लपून बसलेला!!
    मनाचे प्रकार किती ??... चेतन, अवचेतन, अर्धचेतन, वेडे मन( जाने क्या चाहे मन बावरा...), उधळलेले मन, मराठी मन..... ???
    मन हे नेमके काय रसायन आहे??.... मेंदुच्या कुठल्यातरी cell मधे दडलेला data आणि त्यावर परिस्थितीजन्य hormones & enzymes या सगळ्यांचा जांगळ्बुत्ता म्हणजे मन...त्यातून निर्माण होणारे चित्रविचित्र आजार आणि प्राणी... गजिनी, अपरिचीत, मोंजुलिका(.. आमी जे तोमार..) आणि मराठी माणूस(पाठीत खंजीर खुपसला हो आमच्या !!!)
    छे छे !! वैज्ञानिक दृष्टिकोण लावला तर सगळ्या रसिकतेची वाट लागते!!! बहिणाबाईंनी मनाची जशी सुंदर व्याख्या केली तशी कुणी वैज्ञानिक करु शकतो??? मनाचा थांग लागत नाही हे या वैज्ञानिकांना कळत कसे नाही???
    ठरलं तर मग... आपण मनाची व्याख्या वगैरे करण्याच्या भानगडीत पडायचं नाही. मनात येईल ते ईमानेइतबारे type करायचं...

टिप्पण्या

  1. Hi Sanket, I liked your idea to get out of cocoon and write something to feel free. I also liked your thoughts about mind and psyche of human beings and your style of writing. I would like to read a lot more from you.

    उत्तर द्याहटवा
  2. @Ganesh
    Thank you very much for your encouragement, friend.Yes, lot more is going to display here because im really trying hard to get out of cocoon

    उत्तर द्याहटवा
  3. नाव छान आहे ब्लॉगचं. आणि आपल्या दोघांचंही नाव एकच आहे, पण आपल्या दोघांच्याही ब्लॉगवरच्या पहिल्या पोस्टचं नावही एकच असणार होतं आधी! मी ब्लॉगला नाव देताना आधी ‘मन वढाय वढाय’ हेच ठरवलं होतं आणि त्याच नावाची पोस्ट लिहिणार होतो. पण, नंतर छोटं नाव हवं म्हणून एकशब्दी नाव निवडलं... :-)

    उत्तर द्याहटवा
  4. संकेतराव, काय पण योगायोग आहे. बर्‍याच गोष्टी जुळतात म्हणजे.. (जेवणाबद्दल कळले आहेच, आता हे...)चांगलं झालं नाव वेगळे निवडले, लोकांना नाहीतर एकाच व्यक्तीचा ब्लॉग वाटला असता.
    ब्लॉगवर हार्दिक स्वागत. भेट देत राहा..

    उत्तर द्याहटवा
  5. अहो मत कहो ना... म्या काय एवडा म्वोटा मानूस न्हाय की मला कोनी अवं म्हनावं. तवा मला आपलं ‘आरं’ म्हना राव.

    उत्तर द्याहटवा
  6. आता ती स्टाइल आहे "राव" लावण्याची नावापुढे !!! नाही करणार "अहो=जाहो""

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

निबंध :-- माझे आवडते पक्वान : हलवा

'मर्ढेकरांची कविता' : बेकलाइटी नव्हे, अस्सल !

काही चारोळ्या - १

माउस पाहावे चोरून !

द ग्रीन फ़्लाय