ती....
शृंगारिक कविता किंवा प्रेम कविता हा माझा प्रांत नव्हे. पण एक प्रयत्न केला होता फार दिवसांपूर्वी (फेब्रुवारी ११,२०१०). मग सहजच ती कविता मराठीकविता या संकेतस्थळावर प्रकाशित केली होती.तिथे प्रतिसाद ठीकच होता. पण आता अधिकाधिक लोकांचा प्रतिसाद कळावा म्हणून परत इथे post करतोय. आपली प्रतिक्रिया अगदी परखडपणे द्या. या कवितेनंतर मी पुन्हा कधी या प्रकारात कविता केली नाही.असो, सहन करा आता ही कविता...
ती....
अल्लड अवखळ, पाण्याची खळखळ
तापणार्या बनात, पानांची सळसळ
ती....
ओठांवर हसू ,लटका राग
भुंग्याचा पिंगा, फुलांचे पराग
ती....
पायांत पैंजण,हातांवर गोंदण
काटेरी झुडपाला, गुलाबांचे आंदण
ती....
गालावर खळी, नजरेचे बाण
सैरभैर मन, वारा बेभान
ती....
भावनांचा पूर, शब्दांचा दुष्काळ
विस्फारलेल्या नजरा, चर्चांचे गुर्हाळ
अरे मस्त! हि कविता आधी पण तू मला पाठवली होतीस!!
उत्तर द्याहटवाबास बास गडी फॉर्मात येतोये!!
अरे..... बिनतोड.... काय ग्गोड कविता आहे.. व्वाह... सुरेख रे सुरेख...
उत्तर द्याहटवा@AAKASH : बरोबर ओळखलीस रे कविता. ही तीच आहे.
उत्तर द्याहटवा@ : सौरभ : धन्यवाद.म्हणजे पुन्हा या प्रकारात कविता करावी काय??
उत्तर द्याहटवाजमतंय कि तुम्हाला मग थांबलाय का ?
उत्तर द्याहटवाह्वा सुरु आणि अजून येऊ द्यात :)
छान कविता आहे...अजुन पोस्ट करत जा
उत्तर द्याहटवाविक्रमदा, धन्यवाद... आता नव्या कविता सुचल्या की येत राहतील..
उत्तर द्याहटवा@ सागरदा: धन्यवाद... असा प्रतिसाद मिळाला की हुरूप येत राहतो.
उत्तर द्याहटवाsuper like !!!
उत्तर द्याहटवासुपरधन्यवाद श्रियाताई ! :)
उत्तर द्याहटवा