काय लिहू आज...

काय लिहू आज... एक शनिवार कंटाळवाणा ....
कितीतरी गोष्टी करायच्या राहून गेल्या..
खरं तर साधा प्रयत्नही  नाही केला...
पराभव हा माझाच, लाजीरवाणा ..

कित्येक  बघितलेली स्वप्नं...
स्वप्नातच विरलेली...
दिवस  उजाडताच  नवा ...
माझी तीच वाट, अंधारलेली ...


एक काळ असा येईल..
माझ्या स्वप्नाप्रमाणे घडेल..
माझी ताकद  मलाच कळेल ..
पण तोही..कदाचित स्वप्नातच..

काय लिहू आज ..मी  दुर्मुखलेला.
खरडल्या चार ओळीच..
मनस्थिती निराशलेलीच...
थांबतो इथेच.. मी कंटाळलेला ..

२ टिप्पण्या:

  1. हे अस फ़िलिंग येत रे कधी एखाद्या दिवशी...मस्त मांडलस...

    उत्तर द्याहटवा
  2. @ davbindu:
    शनिवारचा दिवस अगदी धमाल गेल्यानंतर अचानक रात्री अशी मनस्थिती कशी झाली, माहित नाही. पण त्याच भावनेत ह्या ओळी खरडल्या आणि पोस्ट सुद्धा केलं. अगदी सहज ,फारसा विचार न करता लिहित गेलो. कदाचित यांना साहित्यिक value नसावी, पण मनापासून लिहिलंय हे नक्की .

    उत्तर द्याहटवा

Share

Twitter Delicious Facebook Digg Stumbleupon Favorites More