"पाडकृती" किंवा ज्याला सामान्यजन "पाडाडी" म्हणतात अशा वर्गीकृत केलेले अनेक जिन्नस आहेत .बुंदी पाडणे, विटा पाडणे, मुख्यमंत्री पाडणे, मंत्री पाडणे,आमदार- खासदार पाडणे,सरकार पाडणे, प्रेमात पाडणे , ब्लॉ ग पाडणे,लेख पाडणे, शब्द पाडणे(ही कृती आमचे मित्र श्री. सत्यवान वटवटे उत्कृष्ट पाडतात. ते सातत्याने नवीन शब्द पाडत असतात.उदाहरणांसाठी त्यांचा ब्लॉ ग तपासावा. ) अशा अनेक पाडाडी लोकप्रिय आहेत.पण कविता पाडणे ही नाविन्यपूर्ण पाडकृती आम्ही सर्वप्रथम निर्मिली. आमच्या स्नेह्यांना आम्ही ही पाडकृती चाखायला दिल्यावर अनेकांना प्रचंड आवडली. त्यांपैकी एक स्नेही कवी ता. पाडे यांना आम्ही त्याची कृतीही लिहून दिली.मग त्यांनी कविता पाडण्याचा स्वतंत्र व्यवसाय चालू केला जो छान चालतही आहे.त्यांच्या या व्यवसायाला आमच्या शुभेच्छादेखील आहेत. मात्र कविता पाडण्याचा मक्ता आमच्याकडेच आहे आणि ते trade secrete आम्ही कुणाला देणार नाही अशी एक भावना त्यांच्यात बळावत आहे असे आमच्या निदर्शनास आले आहे. तसेच आमच्या पाडलेल्या कविता सर्वोत्कृष्ट अ...
haha!! aata physics kade walaas.....ata kahi khara nahi :))
उत्तर द्याहटवाभारी रे...:)
उत्तर द्याहटवालवकरच रजनिकांतचे गुरुत्वाकर्षणाचे,सापेक्षतेचे सिद्धांत, गतीविषयक तीन नियम वैगेरे येउ देत....