त्रिवेणी -- क्र. १ ते ६
त्रिवेणी क्र. १ -- रस्त्यावर उडणारा धुरळा.. आणि माणसांचा गोतावळा.. . . . . . .अजून एक आत्मा आज मुक्त झाला ********************************************* त्रिवेणी क्र. २ -- कृष्णाला सांगा वस्त्र चोरु नकोस आता.. कृष्णाला सांगा मडके फ़ोडू नकोस आता.. . . . . . महिला आयोग स्थापन झालाय ना आता .. ************************************************** त्रिवेणी क्र. ३ -- मी तारे आणले असते तु्झ्यासाठी .. मी नक्षत्र आणले असते तुझ्यासाठी.. . . . . पण तूच आकाशात जाऊन बसलीस ... :( ************************************************* त्रिवेणी क्र. ४ -- यंदा काय ती कडाक्याची थंडी होती ! यंदा काय ते धुके गोठले होते !! . . . .. . यंदा पिकांवर कीड पडली होती.... ********************************************** त्रिवेणी क्र. ५ -- वर बघितले की नक्षत्रांची आरास किती सुंदर दिसते.. अंगाला स्पर्शणारी वार्याची झुळूक किती शीतल भासते.. . . . . झोपायला आजसुद्धा फ़ुटपाथच नशिबात आले.. ********************************************** त्रिवेणी क्र. ...