त्रिवेणी -- क्र. १ ते ६

त्रिवेणी क्र. १ --

रस्त्यावर उडणारा धुरळा..
आणि माणसांचा गोतावळा..
.
.
.
.
.
.अजून एक आत्मा आज मुक्त झाला

*********************************************

त्रिवेणी क्र. २ --

कृष्णाला सांगा वस्त्र चोरु नकोस आता..
कृष्णाला सांगा मडके फ़ोडू नकोस आता..
.
.
.
.
.
महिला आयोग स्थापन झालाय ना आता ..

 **************************************************

त्रिवेणी क्र. ३ --

मी तारे आणले असते तु्झ्यासाठी ..
मी नक्षत्र आणले असते तुझ्यासाठी..
.
.
.

.
पण तूच आकाशात जाऊन बसलीस ... :(

*************************************************

त्रिवेणी क्र. ४ --

यंदा काय ती कडाक्याची थंडी होती !
यंदा काय ते धुके गोठले होते !!
.
.
.
..
.
यंदा पिकांवर कीड पडली होती....


**********************************************

त्रिवेणी क्र.  ५ --
वर बघितले की नक्षत्रांची आरास किती सुंदर दिसते..
अंगाला स्पर्शणारी वार्‍याची झुळूक किती शीतल भासते..
.
.
.
.
झोपायला आजसुद्धा फ़ुटपाथच नशिबात आले..

**********************************************

त्रिवेणी क्र.  ६ --

चांदण्यांची शीतलता नशिबात नाही
रातराणीचा गंध नशिबात नाही
.
.
.
.
.
सूर्याने काय पाप केले होते, विचारावं त्यालाच !

टिप्पण्या

  1. सहावी विशेष आवडली....
    स्वामी, झकास जमतंय कि तुम्हांला हे त्रिवेणीतंत्र ! :)

    उत्तर द्याहटवा
  2. धन्यवाद अनघाताई !!!! पहिलाच प्रयत्न होता हा माझा !! तुम्हाला आवडला आता अजून काही लिहायला (थोडक्यात छळायला) हरकत नाही..

    उत्तर द्याहटवा
  3. मला पहिली, पाचवी आणि सहावी खूप आवडली...लगे रहो स्वामी :)

    उत्तर द्याहटवा
  4. आभारी आहे रे सुझे :) .. असेच पाठबळ देत रहा !!

    उत्तर द्याहटवा
  5. swami mast.....itkyaat AK ne pathwlela ha prakaar bhawla aani tumhi tar lagech chan chan triveni lihyala suruwaat pan kelut...


    Shubhecha

    उत्तर द्याहटवा
  6. स्वामी...मला तर सगळ्या आवड्ल्या...

    अप्रतिम...!!

    उत्तर द्याहटवा
  7. धन्यवाद सारिका !! खूप खूप आभार्स !! :)

    उत्तर द्याहटवा
  8. excellent...
    atishay sundar
    shevatchya don khupach chaan...

    good good! awadlyaat...
    ajun yeudet

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

निबंध :-- माझे आवडते पक्वान : हलवा

'मर्ढेकरांची कविता' : बेकलाइटी नव्हे, अस्सल !

काही चारोळ्या - १

माउस पाहावे चोरून !

द ग्रीन फ़्लाय