त्रिवेणी -- क्र. ७ ते १०

त्रिवेणी क्रमांक ७ >> 

कधीतरी मी स्वप्न पाहिले होते, तुजसवे जगायचे ..
तुजसाठी झुरायचे अन् तुजवीण मरायचे..
.
.
.
यंदा बजेटमध्ये बांबू - उदबती स्वस्त झालेत..


-----------------------------------------------------------


त्रिवेणी क्रमांक ८ >>


तू म्हणालीस साथ देईन तुला पावलापावलांवर..
सुखात, दुःखात,गुलाबांच्या गालिच्यावर ,काटेरी शय्येवर..
.
.
.
इथे नरकात खूप एकटेपणा आलाय बघ ,कधी येशील ??


-------------------------------------------------------------------


त्रिवेणी क्र. ९ >>
 
मी नाही करू शकत जीवापाड प्रेम फक्त तुझ्यावर
धुंद प्रणय,, प्रत्येक श्वास वाहिलेला तुझ्यावर....
.
.
.
 वर बघ जरा , चंद्र भोगतोय आपल्या कर्माची फळे ....


---------------------------------------------------------


त्रिवेणी क्र १० >> 


बजेटमध्ये यंदा वैद्यकसेवा महाग झालीये..
आणि बांबू अन् उदबत्ती  स्वस्त झालेत..
.
.
.
आता खरंच मरण स्वस्त झाले ..
 

 

४ टिप्पण्या:

  1. हेरम्बा, क्र. ९ समजावण्याचा यत्न करतो. ;)
    चंद्राला रोहिणी ही त्याच्या बाकीच्या बायकांपेक्षा जास्त प्रिय होती. मग दक्ष प्रजापतीने चंद्राला शाप दिला, "तुला क्षयरोग होईल", मग शिवाची आराधना करून चंद्राने उःशाप मिळवला. म्हणून चंद्राच्या भाळी क्षय-वृद्धीचा खेळ आला.तर आपला नायक इथे म्हणतोय की मी सारे काही विसरून फ़क्त तुझ्यावरच जर प्रेम केले तर माझ्याही नशीबी कदाचित चंद्रासारखे शापित जीणे येईल.
    अजूनही बरेच काही लिहीता येईल, पण एवढे पुरेशे आहे कदाचित, हो ना?
    बाकी त्रिवेण्या आवडल्यात, त्याबद्दल आभारी आहे.

    उत्तर द्याहटवा

Share

Twitter Delicious Facebook Digg Stumbleupon Favorites More