मजला कळले नाही

पाप पुण्यात घोळ केला, मजला कळले नाही



हाय हिशोब का चुकावा, मजला कळले नाही






आज अशी अबोल वीणा, मलहार असा वेडा


सूर कसे संपास गेले, मजला कळले नाही






मी जपले सखे मनाला, धुंद रात जरी होती


हा गजरा इथे कसा गे, मजला कळले नाही






सात जन्मांचि गाठ होती , पहिला सरला नाही


हात असा कसा कसा सुटावा, मजला कळले नाही






दोनच थेंब हो रक्ताचे , तलवार असे हाती


हा कसला असे पुरावा, मजला कळले नाही



 
 मी मराठी या संकेतस्थळावर   पूर्वप्रकाशित


टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

निबंध :-- माझे आवडते पक्वान : हलवा

'मर्ढेकरांची कविता' : बेकलाइटी नव्हे, अस्सल !

काही चारोळ्या - १

माउस पाहावे चोरून !

द ग्रीन फ़्लाय