विडंबन - सांग सांग भोलानाथ
कविवर्य श्री. मंगेश पाडगावकरांची मनापासून माफी मागून आणि ज्यांनी ही कविता लिहिण्याची प्रेरणा दिली त्या सर्वांना मनसोक्त शिव्या घालून "सांग सांग भोलानाथ " ह्या आपल्या सर्वांच्या लाडक्या बालगीताचे आय टी कामगाराच्या " फ्रस्टेशनगीतात" विडंबन करतोय. सांग सांग भोलानाथ, क्लाएंट चिडेल काय ? प्रोजेक्ट कचर्यात जाऊन, रिलीज मिळेल काय ? भोलानाथ मॅनेजर दया दाखवेल काय ? माझे काम स्वतः उरी घेईल काय ? भोलानाथ, भोलानाथ, खरे सांग एकदा आयटीत डेडलाईन, पाळली जाते कितीदा ? भोलानाथ उद्या आहे,क्लाएंन्टसोबत मिटींग.. सिक लीवची माझ्या, होईल का रे सेटिंग ? भोलानाथ भोलानाथ हाईक मिळेल काय ? ३५-४० टक्क्यांचा पाउस पडेल काय ? भोलानाथ माझ्या कॉम्प ऑफ्स देशील काय ? भोलानाथ मनासारखे काम मिळेल काय ? एक गरीब बिचारे पिडलेले कोकरू, आर्त, काळजाला पिळवटणार्या स्वरात भोलानाथला म्हणाले, " भोलानाथ पुण्याला, जायला मिळेल काय ? भोलानाथ मॅनेजरचे, हृदय पाझरेल काय ? " आकाशवाणी झाली, " भगवान के घर...