विडंबन - नागपुरात

बंगळुरात  लिहून झाले .. आता नागपुरात .. प्रेरणास्रोत मागे  सांगितले आहेच, पुन्हा एकदा सांगतो >> आदी जोशीची "कोंकणात" ही  कविता..
 ही कविता मी "बंगळुरात" च्या सुरातच लिहिली आहे. मुद्दाम नागपुरी मराठी वापरली आहे. आनंद घ्यावा.. 

नागपुरात 


मोठ्ठाल्ले रस्ते..
ट्राफिकले हसते ..
ढोरं बसते..
नागपुरात..

डी पी ची हिरवळ
नागनाल्याचा चिखल
उन्हाळ्यात तळमळ
नागपुरात

नागपुरीचा थाट
हिंदी बम्बाट
इंग्लिशलेबी वाट
नागपुरात

के सी पार्कचा पोहा
पहाटे चारले चहा
उधारीच वाहा
नागपुरात

माहोल पोट्टे
रिकामचोट्टे
संत्र्याचे कट्टे
नागपुरात

मिहानची भरारी
लफडे भारी
दिल्लीची वारी
नागपुरात

बी इ करी
बेरोजगारी
पुण्याची वारी
नागपुरात

मस्तीत चित्त
पाहुणचार मस्त
फॅमिली संग
नागपुरात 



--------------------------------------
बम्बाट = भरपूर .
विदर्भात "बम किंवा बम्बाट " हा शब्द बराच कॉमन आहे.. "अबे,बम मजा आली बे .." एकदम सहज निघणारा उद्गार !

माहोल = हा "भारी /लै भारी" चा समानार्थी..आणि इतरही अनेक अर्थ सुचवतो हा शब्द .. म्हणजे बघा ," क्या भाई, आजकल बम माहोल कर रा तू ! " इथे वेगळाच अर्थ आहे ना ?

डी पी = धरमपेठ .. इथल्या वेस्ट हायकोर्ट रोडवर( WHC Road) बरीच 'हिरवळ' असते. शंकरनगर वा लक्ष्मीभुवन चौकात उभे राहायचे.. :) 

के सी पार्क = कस्तुरचंद पार्क . इथले पोहे खूप प्रसिद्ध आहेत. पण भल्या सकाळीच जायचे.

पहाटे चारले चहा = शंकरनगर चौकात  पहाटे ४-५ ला जायचे आणि चहा घ्यायचा किंवा रामदासपेठेत लोकमत चौकात  जायचे. हा तरुणांचा  फेवरेट विरंगुळा.. 

कवितेत बर्डी ( सीताबर्डी ) सुटली.. :( बर्डीचा महिमा शब्दांत बांधता येणार नाही .. ;)  प्रयत्न करेन परत एकदा  :)

टिप्पण्या

  1. स्वामी जबरी रे. बंगलोरच्या इडली-वड्यांनी तुझ्यासाठी स्वता:ला सांबार्‍यात झोकून दिले खरे पण त्यामुळे तुझ्या प्रतिभेला जबरदस्त बहर आलाय :D

    उत्तर द्याहटवा
  2. लै लै भारी स्वामी...ही जास्त आवडली :) :)

    उत्तर द्याहटवा
  3. वाह भई वाह, लय दिवसांनी बोली ऐकली अन मले घरची सय आली राजेहो!!!!!! पटलं आपल्याले हे बम माहोल हाये!!!!!!,

    उत्तर द्याहटवा
  4. ek number mahol mitra nagpur chi evadhi mahol tarif konach keli nawati bum awadala aplyale 1 number hay........

    उत्तर द्याहटवा
  5. @ सिद्धार्थ :- हेहे ..कसला प्रतिभेचा बहर रे ?? आठवणीचा रवंथ करावा लागतो फक्त !!

    उत्तर द्याहटवा
  6. सुझे : धन्यु धन्यु , मलाही हीच जास्त आवडली.. काय आहे, आपल्या भूमीबद्दल जास्त "नैसर्गिक" लिहू शकतो !

    उत्तर द्याहटवा
  7. गुरुनाथभाऊ :- माहोल हाये का नाय आपला नागपूर ?? धन्यवाद आणि ब्लॉगवर स्वागत राजेहो !

    उत्तर द्याहटवा
  8. मंदार :- धन्यवाद भाऊ , ब्लॉगले भेट देत रायजो

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

निबंध :-- माझे आवडते पक्वान : हलवा

'मर्ढेकरांची कविता' : बेकलाइटी नव्हे, अस्सल !

काही चारोळ्या - १

माउस पाहावे चोरून !

द ग्रीन फ़्लाय