अंतहीन...
अलविदा म्हणताना...
वेदना अंतहीन..
'क्षण' दोन क्षणांचा..
हुरहूर अंतहीन..
नुसतेच कसे गिळावे..
हुंदके कंठातले....
हसरे डोळे जरी..
आसवे अंतहीन..
पाठमोरी आकृती
ठिपका होतांना..
परिघात अडकले..
जीवन अंतहीन..
तू असलास जरी..
परक्या बाहुपाशात..
तुझाच मजला...
आधार अंतहीन..
नजरानजर क्षणाची..
मन रे अडकले..
तो विसरायाची..
साधना अंतहीन..
मोहाच्या चांदराती..
बेसावध चांदण्या..
फसव्या स्वप्नांचा
पाठलाग अंतहीन..
आज पुन्हा एकदा..
एकांताची साथ..
विस्कटलेल्या बिछान्याचे.
भास अंतहीन..
तुटता तुटेना..
ताण अंतहीन..
सुटता सुटेना..
प्राण अंतहीन..
येऊ दे ते ..
मरण अंतहीन..
जळू दे ते..
सरण अंतहीन..
प्रचंड डिप्रेसिंग !!!!
उत्तर द्याहटवाही पावती आहे ती कवितेत मांडलेल्या जिवंत वर्णनासाठीची !!
कमी शब्दांत....खोल अर्थ...
उत्तर द्याहटवाआज मलाही फारसं छान वाटत नाहीचेय ! त्यामुळे अधिकच परिणामकारक ! :)
धन्यवाद हेरंबा !
उत्तर द्याहटवाडिप्रेशनमधून बाहेर आला असशील ही अपेक्षा !
धन्स ताई !
उत्तर द्याहटवाआश्चर्य म्हणजे कविता लिहतांना माझी मनस्थिती अगदी छान होती !
स्वामी ,कविता छान झाली आहे भिडते मनाला ...लगे रहो ...
उत्तर द्याहटवाधन्स देवेन..
उत्तर द्याहटवा