पुनर्जन्माचा प्रथम वर्धापनदिन

रास्कल* हो, माइंड इट  !!
    वाढदिवस वगैरे ऐकले असतील, ही पुनर्जन्माच्या वाढदिवसाची काय भानगड आहे असा प्रश्न पडला असेलच. तर आजपासून बरोब्बर एक वर्षापूर्वी माझ्या मेलेल्या ब्लॉगने रजनीदेवाच्या कृपेने नवा जन्म घेतला.
      तसा मी ब्लॉग सुरु केला होता १९ नोव्हेंबर ,२००९ ला. आरम्भशुराप्रमाणे २ लेख पटापट लिहिलेसुद्धा. पण तेव्हा रजनीदेवाची माझ्यावर कृपादृष्टी नसल्याने ब्लॉगचा अकाली मृत्यू झाला. मी फार चिंतीत होतो. मला काही सुचेनासे झाले होते. मग एके दिवशी मला आकाश गुप्ते भेटला. त्याने मला रजनीदेवाविषयी सांगितले. तेव्हापासून माझे जगच बदलले. तो म्हणाला तू रजनीकांत ची आरती लिही.बघ तुझे मराठी ब्लॉग विश्वात कसे नाव होईल. मग मी त्याच दिवशी रजनीदेवाची हिंदी आरती लिहिली आणि ब्लॉगवर टाकली. नतीजा बेहद चौंकानेवाला था. मला त्याचे लगेच परिणाम दिसले. बऱ्याच लोकांनी ती आरती सश्रद्ध वाचली. कमेंट्स आल्यात. हा रजनीनामाचा महिमा होता. आता रजनीदेवाच्या कृपेने दुसऱ्या दिवशी मराठी आरतीसुद्धा आली. ब्लॉग धावू लागला. पाठीराखे बनलेत. ब्लॉगचा नवा जन्म झाला होता. रजनीनामाचा महिमाच असा की तेव्हा जिकडे तिकडे रजनीभक्तीचा प्रसार होऊ लागला. आकाश, मी ,सौरभ साऱ्यांच्याच ब्लॉगवर रजनी; आणि आंतरजालावर रजनीमहती कथन करणाऱ्या लेखांची रेलचेल. मला नवी ओळख मिळाली, मी स्वामी संकेतानंद या नावाने ओळखला जाऊ लागलो.
         वर्धापनदिनानिमित्त काय लिहावे असा प्रश्न पडलाच नव्हता. कारण रजनीदेवाच्या आरतीने मिळालेल्या पुनर्जन्माचा वाढदिवस रजनी-स्तुतीनेच करायचा , नाही का ? तर रास्कल हो, स्वामींनी रजनी-संकीर्तन लिहिले आहे. आज दिवसभर रजनीनामाचा गजर होईल. अगदी मोठ्याने
रजनीनामाचा गजर करायचा, तल्लीन व्हायचे. देवाजींची जशी माझ्यावर कृपा झाली तशी तुमच्यावरही होईल. आजच सुरुवात करा आणि प्रत्यक्ष अनुभव घ्या.

बोला रजनी, रजनी बोला, बोला रजनी-रजनी

बोला रजनी, रजनी बोला, बोला रजनी-रजनी

तूच गुरू, तूच सखा, तुझ्याच सारे भजनी

बोला रजनी, रजनी बोला, बोला रजनी-रजनी
बोला रजनी, रजनी बोला, बोला रजनी-रजनी

तुझ्याच कृपेने चषक जिंकला यंदा धोनी

बोला रजनी, रजनी बोला, बोला रजनी-रजनी
बोला रजनी, रजनी बोला, बोला रजनी-रजनी

झूझू सुद्धा तुझीच नक्कल करतो बेमानी

बोला रजनी, रजनी बोला, बोला रजनी-रजनी
बोला रजनी, रजनी बोला, बोला रजनी-रजनी

सारे विग लावती, तूच टकलाशी इमानी

बोला रजनी, रजनी बोला, बोला रजनी-रजनी
बोला रजनी, रजनी बोला, बोला रजनी-रजनी

३३ कोटी स्वर्गात, भूतळी सचिन आणि रजनी

बोला रजनी, रजनी बोला, बोला रजनी-रजनी
बोला रजनी, रजनी बोला, बोला रजनी-रजनी
बोला रजनी, रजनी बोला, बोला रजनी-रजनी
बोला रजनी, रजनी बोला, बोला रजनी-रजनी

रजनीनामाचा गजर होऊ द्या 

बोला रजनी, रजनी बोला, बोला रजनी-रजनी
बोला रजनी, रजनी बोला, बोला रजनी-रजनी

बोला रजनी, रजनी बोला, बोला रजनी-रजनी बोला रजनी, रजनी बोला, बोला रजनी-रजनी

रजनीकांतच्या नावाने.....  MIND IT  अण्णा  !!!

तमिळप्रान्तस्वामी, सहस्रसूर्यप्रकाशित, कोटिहस्तबलाभुषित,सर्वयुद्धकलाविषारद, धुम्रदन्डिकाधारी, कृष्णनयनावरणउच्छालिता, अभिनयसम्राट, मनोरंजनदाता, भाग्यविधाता,तरुणातितरुण, चिरतरुण, देवाधिदेव, चित्रपटदेव, रजनिकांतदेवजीकी...... जय !!!!


 *रजनी संप्रदायात रास्कल हे अतिशय मानाचे संबोधन आहे.

टिप्पण्या

  1. पुनर्जन्माच्या प्रथम वर्धापनदिनाच्या रजनी शुभेच्छा !

    >> ३३ कोटी स्वर्गात, भूतळी सचिन आणि रजनी

    हे आवडलं... माईंड इट !!

    उत्तर द्याहटवा
  2. धन्यवाद सपा, हेरम्ब आणि विनायकजी !!

    उत्तर द्याहटवा
  3. मी गेल्याच आठवड्यात पूदुचेरीतल्या एका हॉटेलमधेय जेवताना समोर दिसलेल्या TV वर दिसणा-या नटाला पाहून 'हा कोण?' अस बरोबरच्या लोकांना विचारलं. मी त्यांची पाहुनी होते म्हणून मार खाण वाचल ... कारण तो साक्षात रजनीकांत होता :-)

    उत्तर द्याहटवा
  4. अरे रजनी !! सविताताई, ती आत्महत्या ठरली असती, खून नव्हे.. देवाला ओळखले नाही, आणि तेही दक्षिणेत ?? कहर म्हणायचा ;-)

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

निबंध :-- माझे आवडते पक्वान : हलवा

'मर्ढेकरांची कविता' : बेकलाइटी नव्हे, अस्सल !

काही चारोळ्या - १

माउस पाहावे चोरून !

द ग्रीन फ़्लाय