वही


जुनी काही पाने दुमडलेली स्वप्नांच्या वहीत...

काही होत्या विस्मृतीत  गेलेल्या  कविता..
वेड्या वयातल्या वेड्या मनाच्या संहिता..

कोणाचे अल्लड स्मित  आठवणींच्या कुपीत..
काही रोजच गोंजारलेले मोरपिसांचे गुपित...

थोडे शब्द बापुडे चिंब ओले आठवणींत..
काही भावना कोसळत्या जलप्रपातात ...

होते काही मौक्तिकबिंदू गळालेले कातरवेळी...
होती चाहूल लागलेली  कुणाची वेळी - अवेळी..

एक प्रयत्न उधाण वारा कवटाळण्याचा..
नि होता एक  प्रयत्न आसमंत गवसण्याचा

होते काही क्षण रेंगाळलेले उंबर्‍यावर
एक पिंपळपान भरकटलेले वार्‍यावर

चाळता ती पाने  जाणीव झाली मजला..
संसार माझा स्वप्नांच्या सरणावरी  सजला..

वही जाळली मी आज माझ्या  स्वप्नांसहित ....


२ टिप्पण्या:

 1. 'स्वप्नवही',हि कल्पना सुरेख! आठवणींचे असेच काहीसे होते...कवितेचे शीर्षक आवडले.
  कविता छान आहे शेवट गोड असता तर अजून छान वाटली असती.

  उत्तर द्याहटवा
  प्रत्युत्तरे
  1. धन्यवाद श्रिया.. कवितेचा शेवट खूप आधीच लिहीला गेला होता आणि वेगळ्या मनस्थितीत असतांना, त्यामुळे तसा आहे. :)

   हटवा

Share

Twitter Delicious Facebook Digg Stumbleupon Favorites More