स्वामींचे अभंग -१

 

आयटीचे अभंग

 
 क्युबिकली दिन । कंटाळवाणा सारा ॥ कामाचा भारा । रोजचाच ॥ कीबोर्डवरी नुस्ती । बोटे चालली ॥ रात्र विझली । कामापायी ॥
आयटीत गेला । गुदमरून जीव ॥ कोणा नाही कीव । स्वामी म्हणे॥
 
 
कळपाचा मेंढर । तैसा मी चाललो ॥ रुततच गेलो । गाळात या॥
स्वतंत्र प्रज्ञा । विझुनिया गेली ॥  निर्बुद्ध हमाली । केली सारी ॥
आता गा देवा । करावी सुटका ॥ झालो मी फाटका । स्वामी म्हणे॥
 
 

टिप्पण्या

  1. रहा, रहा.. तिथेच रहा .. अन्यथा साहित्यविश्व एका 'आय टी साहित्यिकाच्या' सेवेपासून वंचित राहील. :-)

    एक करा .. एक 'प्रोजेक्ट सायकल' व्यक्त करून घ्या आता अभंगात :-)

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

निबंध :-- माझे आवडते पक्वान : हलवा

'मर्ढेकरांची कविता' : बेकलाइटी नव्हे, अस्सल !

काही चारोळ्या - १

माउस पाहावे चोरून !

द ग्रीन फ़्लाय