पोएटिक लिबर्टी


ढिंगच्याक ढिंकच्याक पोएटिक लिबर्टी
कूल, हॅपनिंग, फ़ूल्टू डर्टी

आला आला श्रावण
झोपाळ्यामागे रावण
अमेरिकेची गार्‍हाणी
गणपत वाणी
सिग्गी पितांना
मॉलमध्ये फ़िरतांना
हाथों में हाथ
तेरा मेरा साथ
हाड हूड
कमॉन डूड
व्हॉट्स योर प्रॉब्लम ?
नेव्हर माइंड डियर
इट हॅप्पन्स हियर

अहाहा ! ते दृष्य पहा
मला पहा फ़ुले वहा
जीवन त्यांना कळले हो
कळले ते पाजळले हो
हो-हल्ला क्यूँ है भाई ?
किसकी मर गई माई ?
जीयो जी  भर के
एक और पराठा मख्खन मार के
हू वन दि मॅच ?
डन्नो, आय हॅव फ़्लाइट टू कॅच

केल्याने होत आहे रे
थांबल्याने मौत आहे रे
चला चला पुढे चला
पुढच्याच्या पुढे चला
समझौता करनेका नहीं
कुचल डालो,रुकनेका नहीं
छोटी बातों की चिंता छोड़ दो
भक्तगणों, गहरी साँस अंदर लो
डूड, इट्स क्वाएट ऍब्सर्ड
बट आय डू केअर अबाऊट दि वर्ल्ड

नवे-पुराणे
अधिक-उणे
साहित्याचा कागद
कागदावरचे साहित्य
भेळपुरी भेळपुरी !!
होता है अक्सर ऐसा
चाहिए प्रसिद्धी या फ़िर पैसा
सुबह घर से निकला था कोई
पर वो उसका घर था ही नहीं
व्हॉट मॉडर्निस्ट ? व्हॉट पोस्ट-मॉडर्निस्ट ?
दि होल वर्ल्ड इज ब्लडी अपॉर्च्युनिस्ट !

अहा ! काय मस्त वाटतंय आता !! अहा !
गार गार ! फ़ुल पगार !!
भेजा बिल्कुल साफ़ 
सब गुनाह माफ़
ढिंगच्याक ढिंकच्याक पोएटिक लिबर्टी
कूल, हॅपनिंग, फ़ूल्टू डर्टी


---- पुणे  
२८ मार्च, २०१३

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

निबंध :-- माझे आवडते पक्वान : हलवा

'मर्ढेकरांची कविता' : बेकलाइटी नव्हे, अस्सल !

काही चारोळ्या - १

माउस पाहावे चोरून !

द ग्रीन फ़्लाय