विडंबन - अध्यक्ष

अध्यक्ष एक नाट असतो
पदाच्या प्रतिष्ठेची लावलेली वाट असतो

बोलत असला तरी ऐकवत नाही
आता नसला बोलत तरीही
'बोला' म्हणवत नाही

संमेलन संपते पंगती उठतात
रिकाम्या मांडवात पत्रावळी साठतात

अध्यक्ष मनामनात तसंच ठेवून जातो काही
लिव्हरचं लिव्हरलाच कळावं असं
जातो देऊन काही

अध्यक्ष असतो एक धागा
वादाला तोंड फ़ोडणारी
पीठावरची जागा

संमेलन नसलं तेव्हा त्याचं नसतं भान
कोटी केली भाषणात
की सैरावैरा धावायलाही कमी पडतं रान

रसिक येतात जातात
कवी मात्र व्याकुळच
त्याची कधीच भागत नाही तहान
दिसत नसलं डोळ्यांना तरी
खोदत गेलो खोल खोल
की सापडतेच
काव्यसंग्रहांची खाण

याहून का निराळा असतो अध्यक्ष ?
तो पीठावर नाही तर
कोणावर करतात टीका
पत्रकार दक्ष

अध्यक्ष खरचं कोण असतो ?
कोट्यांची खाण असतो
लिव्हरची जाण असतो
अक्कल गहाण असतो
पायातली वहाण असतो
तुंबलेली घाण असतो

अध्यक्ष असतो फक्त मुलींसाठी
लाजतही नाही , वाजतही नाही

-- स्वामी संकेतानंद ,
६ जानेवारी, २०१४ 
दिल्ली 

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

निबंध :-- माझे आवडते पक्वान : हलवा

'मर्ढेकरांची कविता' : बेकलाइटी नव्हे, अस्सल !

काही चारोळ्या - १

माउस पाहावे चोरून !

द ग्रीन फ़्लाय