म्हातारे!

म्हातारे तुझ्या ओंजळीत

बकुळफुले सुगंधित

दरवळे गे आसमंत

सान्निध्यात तुझ्या


म्हातारे तुझ्या नयनी

ब्रह्मतेजाचे गे पाणी

बहरली गे धरणी

मोतीयाने कशी


म्हातारे तुझी वैखरी

पंचतत्वांना उद्धारी

जणू तुझ्या अभ्यंतरी

परा बोलावते


म्हातारे तुझ्या कुशीत

खेळे दिवस निशीथ

मृत्यूही उभा वेशीत

रेंगाळत राहे


म्हातारे तुझा सहवास

की मायेचा गे गळफास

आता भावबंधाचा पाश

तोडवेना मला




-संकेत

२९ जुलै २०१९


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

'मर्ढेकरांची कविता' : बेकलाइटी नव्हे, अस्सल !

पाडाडी - कविता कशा पाडाव्या ??

काही चारोळ्या - १