पोस्ट्स

काही चारोळ्या - १

कधी काळी सहजच लिहील्या गेलेल्या ह्या चारोळ्या... पहिली वगळता इतर सर्व बझ्झवर टाकल्या होत्या.  १ ) त्याचे नशीब माझे असते तर बरे झाले असते दगडावरची रेघ खोडणे एवढे पण सोपे नसते   २) तुझ्या त्या आठवणी, तुझे ते भास.. रखरखत्या वाळवंटी , मृगजळाचे आभास.. कधी दचकून उठावे, रात्री अवचितच.. तूच निजलीस शेजारी, खोटा ठरतो विश्वास..   ३) सावध असतो मी , आता स्वप्न बघतांना  स्वप्नातली तू , काल प्रत्यक्षात दिसलीस.... माझ्या बंद पापण्यांच्या कैदेतून गं तू  कशी काय फरार झालीस ?   ४) सारेच बंध तोडून ये.. अशी धाव सैरभैर ये.. रातीला कवेत घेतो मी.. चांदण्यांना लपेटून ये..   ५) काळोखाच्या सावलीत... उदास कुजबूज... काजव्यांच्या ओठी.. चांदण्यांचे गुज..    ६) रक्तिम क्षितिजावर.... स्वप्न उदयास आले.. पंखातील चैतन्य.. आसमंत झाले...  

निसर्गाशी एकरूप होतांना - ठाकुरांचे ’आकाश भॉरा शूर्जो तारा ’

इमेज
आपण या निसर्गाचा एक भाग आहोत ही जाणीव जेव्हा होते तेव्हा मनात नेमक्या कोणत्या भावना येतात ? निसर्गाच्या सौंदर्याचा आविष्कार जेव्हा अनुभवतो, तेव्हा मन कसे पाखरू होते ना ?    रबिंद्रनाथ ठाकूरांचे ’आकाश भॉरा शूर्जो तारा ’ हे असेच एक सुंदर गीत. निसर्गात रोजच घडणार्‍या गोष्टींकडे बघण्याची एक नवीच दृष्टी इथे आपल्याला दिसते. निसर्गाच्या विविध रूपांत आपले स्थान गवसल्यावर उचंबळून येणार्‍या भावना गुरुदेवांनी सहजसोप्या आणि गेय शब्दांत गुंफ़ल्या आहेत. शेवटच्या ओळी तर हा ’स्वत्वा’चा साक्षात्कार अगदी अचूक पकडतात. " कान पेतेछी, चोख मेलेछी, धॉरार बुके, प्राण ढेलेछी जानार माझे ओजानार कोरेछी शोंधान " एकदा का स्वत्वाचा साक्षात्कार झाला की नेहमीच्याच ओळखीच्या गोष्टींकडे बघण्याचा दृष्टीकोण बदलतो आणि मग सुरु होतो ज्ञातांमधल्या अज्ञातांचा शोध.. या गीताचा मी माझ्या परीने मराठीत अनुवाद करायचा प्रयत्न केला आहे. या प्रयत्नात मला मोलाच्या सूचना देणार्‍या सविताताईंचे आभार.                आधी मूळ बांग्ला...

ठाकुरांचा आर्त स्वर - ’आज ज्योत्स्नाराते’

इमेज
   रबिंद्र संगीताबद्दल ऐकून होतो, पण प्रत्यक्षात कधी ऐकले मात्र नव्हते. ऑगस्ट २०११ चा कुठलातरी शुभदिन. खरेतर रात्र, त्यादिवशी रात्रपाळीला होतो. फारसे काम नव्हते. अचानक आठवले की आपल्याला रबिंद्र संगीताबद्दल जाणून घ्यायचे आहे. विचार केला आधी ऐकूया जरा. यूट्य़ूब उघडले. ’रबिंद्र संगीत’ टाकून शोध घेतला. एक गाणे दिसले, ’आज ज्योत्स्नाराते’, लावले. सुरुवात 'इसराज’ या वाद्याच्या दर्दभर्‍या तुकड्याने होते. आणि २ मिनटानंतर शहाना बाजपेईचा आवाज जादू करायला सुरुवात करतो. जसजसे गाणे पुढे सरकते तसतसे ते गाणे, ते संगीत, शहानादिंचा आवाज आणि गुरुदेवांचे ते  शब्द काळीज चिरत  जातात.     गुरुदेवांनी अशी मन कातर करणारी कविता का लिहीली असेल आणि त्याला तितकीच आर्त चाल का लावली असेल असा प्रश्न पडतो. मग ह्या गीताच्या पार्श्वभूमीबद्दल जाणून घेतले. कळले की, हे गीत ठाकूरांनी त्यांच्या मुलाच्या ’शमिंद्रनाथ’ च्या मृत्यूनंतर लिहीले. शमिंन्द्रनाथ त्यांचा धाकटा मुलगा, वयाच्या अवघ्या तेराव्या वर्षी कॉलरामुळे वारला. याआधी काही काळापूर्वीच त्...

’सोपा’ उपाय ??

इमेज
’फुकट ते पौष्टिक ’ च्या ’ पिपा ’ सेला आळा घालणारा ’ सोपा ’ उपाय        आंतरजालामुळे माहितीची देवाणघेवाण करणे जितके सहज - सुलभ झाले तितके याआधी कधीच नव्हते . ’ माहिती ’ च्या व्याख्येखाली चित्रपट , संगीत , पुस्तके , लेख , संशोधन प्रबंध सारेच आले .  माहितीचा मुक्त स्रोत ही आंतरजालाचे नवी ओळख बनली .  ’ फ़ुकट ते पौष्टिक ’ आणि ’ जे जे आवडे आपणाला , ते ते द्यावे मित्रांना ’ म्हणत जालावर कॉपीराईटेड माहितीच्या अपलोडिंग - डाउनलोडिंगचा सिलसिला सुरू झाला . पिअर - टू - पिअर शेअरिंगच्या तंत्रज्ञानाने तर क्रांतीच आणली .  टॉरेंट संकेतस्थळांचा सुळसुळाट झाला . जागतिक चित्रपट , आजोबांच्या तोंडून फ़क्त ऐकलेले त्यांच्या काळातले चित्रपट , जुन्या मालिका सगळे टॉरेंट्सच्या माध्यमातून सहज मिळू लागले . शेकडोंनी असलेल्या संगीत - संकेतस्थळांमुळे हवी ती गाणी हव्या त्या वेळी ऐकण्याची , डाउनलोड करून संग्रही ठेवण्याची सोय झाली .  इ - बुक्स डाउनलोड करून लोकांनी आपली वाचनाची भूक भागवण...