श्वेतसुमनांसाठी......

   हे गीत आहे, युद्धात होरपळल्या जाणार्‍य़ा मुलांसाठी. युद्ध होतात, कुणाच्या राजकीय फायद्यासाठी, कुणाच्या खोट्या अस्मितेच्या नावावर. मात्र एक पिढी गुदमरली जाते. युद्धग्रस्त भागात बघा, मुलांना त्यांचे बालपण सुद्धा उपभोगता येत नाही. काश्मिरातल्या मुलांचे बालपण ते काय असणार, AK-47 च्या सावलीत जाणारं! गोळीबाराचा आवाज हेच त्यांचे अंगाईगीत."आज कर्फ्यू है " हे त्यांचे बोबडे बोल. त्यांचे बालपण हरवत असते. आणि आपण "युद्धस्य कथा रम्य" म्हणत असतो. सगळ्या युद्धग्रस्त भागात थोड्याफार फरकाने हीच स्थिती असते.
        महान तमिळ गीतकार/कवी वैरामुथु यांनी हे गीत "कण्णत्तील मुत्तमिटाल "  या मणीरत्नम यांच्या चित्रपटासाठी लिहीले. तमिळ वाघांच्या लढ्याच्या पार्श्वभूमीवर एका मुलीच्या भावविश्वाचे चित्रण म्हणजे हा सिनेमा. संगीत रहमान सरांचे आहे.हे गाणे त्यांनीच गायले आहे. या चित्रपटाच्या गाण्यांकरता दोघांनाही राष्ट्रीय पुरस्कार मिळालेत. मला हे गाणे खूप आवडते म्हणून मी मराठी अनुवाद करायला घेतला. अगदीच शब्दशः नाही.वैरामुथु सरांना अभिप्रेत असलेल्या भावना पकडण्याचा प्रयत्न केलाय. तमिऴ अनुवादाचा पहिलाच प्रयत्न असल्याने कितपत यशस्वी झाला सांगणे कठीण आहे.
      गाण्याचे तमिऴ नाव आहे " वेल्लइ पूकल " (श्वेतसुमने). हा शब्द शांतता या अर्थाने वापरलाय. असो, आधी मराठी अनुवाद मग तमिळ गाणे ...

श्वेतसुमने सार्‍या विश्वात  बहरावी
पहाटे भूमी शांततेसाठीच उजळावी
ह्रदयावर सोनेरी किरणे  पडावी
फुले आळस झटकून उमलावी


मुल उठावे
आईच्या उबदार कुशीत
पहाट व्हावी
मुलांच्या चिमुकल्या हास्यासहित


वार्‍याच्या संगीतात
वर्षा गाते त्या गाण्यात
एका मौनाचं आनंद देता येईल ?
कोटी किर्तनांत,
कवी निर्मीत शब्दांत,
छोट्या अश्रूचा अर्थ सांगता येईल?


जिथे मुलाचे हात पोहचतात,
चांदोबा, तू तिथे उगवशील?
जिथे मानवजाती युद्ध थांबवेल,
श्वेतकोकीळे, तू तिथे गाशील ?

आता तमिऴ गाणे :-
  वेल्लइ पूकल उलगम  एंगुम मलरहवे
विडीयूम भूमी अमैदिक्कागं विडिहवे
मनमेल मन्जल वेळच्चम विऴहवे
मलरे सोम्बल मुरित्त इऴहवे


कुऴन्दई विऴीकट्टुमे
ताईन कदा कदप्पील
उलगम विडीयट्टुमे
पिल्लईन सिरमुगं सि़ऱिप्पील

काट्रीन पेरीसैयिल
मऴई पाडुम पाडांगळूम 
ओरं मौनम पोल ईन्बम तरुमो.....
कोडी कीर्तनमुम
कवी कौर्तं वार्तईगळूम
तुली कण्णीर 
पोल अर्दम तरुमो.......

एंगं सीरकुऴन्दई
तन कैहल नीतिडमो
अंगं तोन्ड्रायो कोल्लई निलवे.....
एंगं मनिदइनम 
पोर ओयिन्दं सायिन्तीडमो
अंगं कूवादो वेल्लई कुयिले..... 









टिप्पण्या

  1. वाह वाह वाह संकेत... मानलं यार... तमिळसारख्या एका कठीण भाषेवरपण चांगलं प्रभुत्व आहे. तमिळ गाणं झेपलं नाही. पण मराठी अनुवाद सुरेख जमलाय.

    उत्तर द्याहटवा
  2. धन्स रे सौरभ !!! चांगलं प्रभुत्वच काय, प्रभुत्व पण नाही रे.. बोलता येत नाही(२-३ वाक्यच.). ऎकलं की थोडीफार समजते... वाचलं की अजून थोडी जास्त कळते... ह अनुवाद करायला ३ दिवस लागले. काही शब्दांचा अर्थ कळला नाही तिथे माझ्या तमिळ मैत्रिणीचा आधार घेतला.उदा : कौर्तं , तिचे म्हणणे की तमिळमधे करुत्त(to create) आहे, कौर्तं नाही. पण मी कौर्तंच ऐकतोय. मात्र अर्थात फरक पडत नव्हता म्हणून मी कौर्तंच राहू दिलं. कदाचित करुत्तचा आणि कौर्त हे एकाच शब्दाचे दोन उच्चार असतील. अशा काही अनोळखी शब्दांमुळे ३ दिवस लागले.

    उत्तर द्याहटवा
  3. मी अधुनमधुन हिंदी गाण्यांचा अनुवाद करतो तु चक्क तामीळ गाण्याचा अनुवाद केलास ...सही रे..हयामागे प्रभुजींचीच प्रेरणा असावी...स्वामी संकेतानंदांचा विजय असो...

    उत्तर द्याहटवा
  4. @ davbindu :- धन्यवाद देचुदा ..अजूनही काही तमिऴ गाण्यांचा मराठी अनुवाद करायचा विचार आहे..

    उत्तर द्याहटवा
  5. chan aahe..maza pan blog aahe ....pan chota asa..bagh kadhi jamal tar bhet devun...he mhanje jas ki p. l. deshapande mhanatat ..ki suryan kajvyach smaran thevalyasarasha aahe...

    उत्तर द्याहटवा
  6. @ pratik :- कोण सूर्य आणि कोण काजवे रे ?? मी पण काजवाच !!! आपण एकमेकांचे स्मरण ठेवावे!!! तुझा ब्लॉग बघितला, छान आहे !!

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

निबंध :-- माझे आवडते पक्वान : हलवा

'मर्ढेकरांची कविता' : बेकलाइटी नव्हे, अस्सल !

काही चारोळ्या - १

माउस पाहावे चोरून !

द ग्रीन फ़्लाय