जॉनी ऍपलसीड


    लहान असतांना "The Wonderworld of Science" या पुस्तकाचे मराठी अनुवाद "विज्ञानाचे नवलपरीचे जग" वाचले होते,नक्की कोणता भाग ते आठवत नाही.हे पुस्तक मला जाम आवडायचे. कित्येकदा पारायणे केली असतील.
खरं तर मी लिहिणे-वाचणे शिकल्यावर वाचलेल्या पहिल्या ५ पुस्तकांतले एक म्हणजे हे पुस्तक.लहान मुलांना लक्षात ठेवूनच लिहिलेले असल्याने विज्ञानाच्या छोट्या छोट्या गोष्टी, सिद्धांत सोप्या भाषेत समजावल्या होत्या.खूप उदाहरणे होती.या पुस्तकामुळे विज्ञानाची गोडी अगदी लहान वयातच निर्माण झाली आणि का? व कसे? यांचे समाधान लहान वयातच झाले. १९४०-५० च्या दशकात ते पुस्तक लिहिलेले होते. मराठी अनुवाद कुणी केला होता ते आता आठवत नाही पण हे पुस्तक मूळ इंग्रजी असेल अशी शंकाही न येण्याइतका सुरेख अनुवाद होता.
     या पुस्तकात असलेल्या अनेक छोट्या कथांपैकी एक म्हणजे जॉनी
ऍपलसीडची कथा.अठराव्या शतकाच्या सुमारास हा भटक्या एकहाती सफरचंदाचे बगीचे उभारत भटकायचा.डोक्यावर टीनाचे टोप आणि खांद्यावर एक काठीला टांगलेली सफरचंदाच्या बियांची पिशवी असे एक रेखाचित्रही होते. याने जेथे सफरचंदाच्या बागा लावल्या तेथे पुढे लोक राहू लागलेत आणि नव्या वसाहती बनल्या असा काहीसा उल्लेख होता.
  परवा अचानक या जॉनीची आठवण आली आणि म्हटलं जरा विकीभाउला विचारून बघू. अपेक्षेप्रमाणे विकीने निराश नाही केले. पुस्तकातल्या महितीहून अधिक आणि जराशी वेगळी माहिती मिळाली विकिवर. म्हणजे त्या पुस्तकात लिहिल्याप्रमाणे तो डोक्यावर पात्र घालून बिया पसरत भटकत नव्हता तर तो व्यवस्थित नर्सरी लावून जायचा. या एका माणसाने ओहायो,इंडियाना आणि इलिनॉय या अमेरिकेतल्या राज्यांत सफरचंदाचा प्रसार केला; आणि हा मिशनरीपण होता.
     २६ सप्टेंबर १७७४ ते १८ मार्च १८४५ ही त्याची कारकीर्द.खरे नाव जॉन चॅपमन पण त्याच्या सफरचंदाच्या वेडामुळे त्याला जॉनी
ऍपलसीडच म्हणायचे.हा पुढे अमेरिकन लिजंड्समध्ये गणला गेला. ऍपलसीडवर पुस्तकं निघालीत आणि डिस्नीने एक ऍनिमेशनपट काढला.   
     असो, तुम्हाला जर जॉनी ऍपलसीडबद्दल माहिती हवी असेल तर विकिवर वाचू शकता.(टिचकी मारा) मी आता त्याचा मराठी अनुवाद करत नाही,माझा मूड नाही सध्या :-D !!!
    
जॉनी ऍपलसीडची कथा वाचून मलासुद्धा आपण भारतभर भटकत आंब्याची झाडे लावावीत असे स्वप्नं पडायचे. :-D हे अशक्य नक्कीच नाही. जिद्द नाही माझ्यात तेवढी. 
  [भविष्यात जर खरंच मी आंब्याची झाडं लावत हिंडलो तर माझे नाव काय असेल ?? "संकेत आम्बाकोय" ?? आणि संत्रं लावलीत तर "संकेत संत्राबीज" ?? (हे pj वहिनीसोबत ऍपलसीडबद्दलच्या गप्पा मारताना मारले होते.) ] 
    जर एकाच चांगल्या ध्येयाचा चिकाटीने पाठपुरावा केला आणि त्यासाठी आपले आयुष्य वेचले तरीदेखील अमर होता येते हा आपला जॉनी ऍपलसीड शिकवून जातो.हे काम कुणीही साधारण व्यक्ती करू शकतो.सध्यापण कित्येक जॉनी ऍपलसीड आपल्यात आहेत.राजस्थानमध्ये पाण्यासाठी काम करणारे श्री. राजेंद्र सिंगजी, नोबेल पुरस्कार मिळालेल्या वंगारी मथाई(यांना वृक्षारोपणासाठीच मिळालाय !), झिम्बाम्ब्वेमध्ये लाखो झाडं लावणारे Marthinus Daneel, केरळमध्ये एकहाती जंगल उभारणारे श्री. अब्दुल करीम आणि महाराष्ट्रात संगमनेरपाशी दंडकारण्य चळवळ चालवणारे वयोवृद्ध श्री. बाळासाहेब थोरात हे सगळे जोंनी ऍपलसीडचाच वारसा चालवत आहेत.सामान्यातलं असामान्यत्व दाखवणारे हे सगळे चालतेबोलते उदाहरण! ह्यांच्यापाशी असलेली जिद्द, चिकाटी,संयम माझ्यापाशी नाही म्हणून या सर्व रियल लाईफ हिरोंना माझे नमन!!
    जरी मी ह्यांच्याइतकी मोठ्या प्रमाणात झाडे लावू शकत नाही तरी पर्यावरणाचा कमीत कमी नुकसान करण्याचा प्रयत्न करतच असतो.
    जर आपण किमान विकांताला जॉनी
ऍपलसीड बनण्याचा प्रयत्न केला तरी बरीच हिरवळ येईल. "थेंबे थेंबे तळे साचे म्हणतात" ना त्याप्रमाणे प्रत्येकाने खारीचा वाटा उचलला तरी बरेच काही साध्या होऊ शकते. सगळे आयुष्य फकीरासारखे जगता येत नसेल पण आपण किमान थोडी काळजी घेतली,थोडी जागरुकता दाखवली तरी या लोकांना एकाकी लढावे लागणार नाही.

 
जाता जाता :- हा लेख जॉनी ऍपलसीडची माहिती द्यावी म्हणून लिहिला नाही तर भविष्यात(सध्यातरी मी 'प्रयत्न' करत असतोच.) मी पर्यावरणासाठी काहीच भरीव किंवा "खारी"व(खारीचा वाटा असलेले) केले नाही की हा लेख वाचून मला शरम यावी आणि मी ते करावे अशी प्रेरणा मला मिळावी म्हणून लिहिला.
(पर्यावरणावरून आठवले आम्ही आमच्या घरातल्या सगळ्या कचर्‍याचे आणि निर्माल्याचे गान्डूळखत बनवायचो, आणि आमच्या झाडांना वापरायचो. आता सगळी पांगापांग झाल्याने ते बंद पडले आणि आता घंटागाडी येते की कचरा गोळा करायला! घरातल्या बर्‍याच गोष्ठी रिसायकल व्ह्यायच्या, अजूनही होतात(उदा. जुन्या फाटक्या साड्यांचे पायपोस,कव्हर वगैरे बरेच काही). माझ्या घराचे कार्बन फ़ूटप्रिंट बर्‍यापैकी कमी होते
.(सध्या थोडे वाढलेय असा अंदाज आहे.) गरजा कमी असल्या की आणि उपलब्ध साधनांचा पुनर्वापर करण्याचे प्रमाण वाढवले की तो आपोआप कमी होतो आणि नकळतच पर्यावरणाची रक्षा होते. झाडे लावता येत नसतील तर किमान याद्वारेतरी थोडी पापं फेडता येतील.पण आधुनिकतेच्या नावावर(उदा. use & throw) आपण पर्यावरणाचे भरमसाठ नुकसान करतोय. मला अपराधीपणाची भावना नेहमी बोचत राहावी म्हणून हा लेखप्रपंच.)

    माझ्या मनात दडलेला
जॉनी ऍपलसीड कधीच मरू नये. 

   [ पोस्ट भरकटत गेलीय मान्य आहे, जसे विचार मनात आले तसे लिहित गेलो.]

टिप्पण्या

  1. वा.. मस्त माहिती दिलीस.. माहित नव्हतं याच्याबद्दल..

    खारीव ... लोल :)


    >> माझ्या मनात दडलेला जॉनी अ‍ॅपलसीड कधीच मरू नये.

    जॉनी अ‍ॅपलसीड मरते नही. (आठवा "आनंद मरते नही" ;) )

    उत्तर द्याहटवा
  2. हेरंबदा :- रॅपीड प्रतिक्रियेसाठी रॅपीड आभार्स !!
    माझे सौभाग्य होते की मला ते पुस्तक लहानपणी वाचायला मिळाले म्हणून मला ऍपलसीडबद्दल माहिती आहे रे !!
    जॉनी ऍपलसीड खरंच मरू नये रे..पाठबळ दिल्याबद्दल धन्स !!

    उत्तर द्याहटवा
  3. हंऽऽ... माहित नव्हतं जॉनीभाऊंबद्दल याआधी. माहितीपूर्ण लेख. :-)

    उत्तर द्याहटवा
  4. एका महत्वाच्या विषयावर लिहलय्स संकेत. आणि लेखात खुप छान माहिती दिलीस तु. तुझं (अ)सामान्यज्ञान वाखाणण्यासारखं आहे.

    उत्तर द्याहटवा
  5. संकेत आंबेकोय उर्फ़ संकेत संत्राबीज,हयाच्याबद्दल माहिती नव्हती, छानच माहिती दिलीस.बाकी तुझ्यातल्या ऍपलसीडला कधी मरु देउ नकोस.आणि तुझी जी काही संकल्पना असेल ती मला पण कळव थोडासा ऍपलसीड माझ्यातपण आहेच....

    उत्तर द्याहटवा
  6. धन्स रे सौरभ!! बघ मी हरभर्‍याच्या झाडावर बसून प्रतिक्रिया देतोय.. आपलं ते सामान्यच आहे रे !!

    उत्तर द्याहटवा
  7. देवेनदा, धन्यवाद !! माझ्यातला ऍपलसीड मरू नये याची काळजी घेतच राहीन आणि हो, मी जर एखादे काम हाती घेतले की ब्लॉगमार्फ़त सर्वांना कळवीन..

    उत्तर द्याहटवा
  8. माहित नव्हतं ह्याच्याबद्दल! धन्यवाद सांगितल्याबद्दल!

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

निबंध :-- माझे आवडते पक्वान : हलवा

'मर्ढेकरांची कविता' : बेकलाइटी नव्हे, अस्सल !

काही चारोळ्या - १

माउस पाहावे चोरून !

द ग्रीन फ़्लाय