भिकारी

" अल्ला के नाम पे कुछ दे दे बाबा ",
एक भिकारी जवळ आला,
एक रुपया देताच  तो म्हणाला,
"चॉकलेट खाऊन जगेन वाटते का तुम्हाला ?
साहेब , ३०० कोटी खाल्ले तरी भूक जात नाही.
प्रेमाच्या दोन बोलांनी भूक मात्र जाणवत नाही.
नुसताच रुपया देऊ नका, थोडे प्रेमही द्या सोबतीला,
अंधारल्या रात्री, काजवा असावा सोबतीला.
दोन क्षणाचा प्रकाश , बळ देऊनिया जातो,
दुनियेने दिलेले , वळ विसरूनिया जातो.
भिकारी नाही हो मी, प्रेम शोधतोय जगात,
वेडाच मी, हिरवे बेट शोधतोय वाळवंटात.
लोक अल्लाच्या नावावर, पैसाच फ़ेकतात,
"कुछ दे दे बाबा" चा अर्थ सोयीने घेतात.
द्यायला बरेच तुजपाशी, परि दानत नाही,
पैशाची कळते भूक, प्रेमाची परि जाणत नाही."
 माझी बघून विचारी मुद्रा, हसतच तो म्हणाला,
"इतके घेऊ नकोस मनावर,तू फ़क्त प्रेम कर जगावर ,
 पैसा कितीही आला हाताशी, विसरू नकोस क्षणभर,
 'अल्लाहू अकबर, अल्लाहू अकबर.' "
 अल्लाहू अकबर = देव सर्वश्रेष्ठ आहे

1 टिप्पणी:

Share

Twitter Delicious Facebook Digg Stumbleupon Favorites More