आता फक्त आठवणी......

मिन्नले या तमिळ चित्रपटात( हिंदी :- "रहना हैं तेरे दिल में " ) एक पिटुकले पण सुंदर गाणे आहे, " इरु विळी उनद. " हे गाणे हिंदीमध्ये नाही. फक्त ह्या गाण्याची धून तेवढी वाजते.( प्रसंग आठवा :- अनुपम खेर सैफुला भेटून सांगतो की बेटा, हे लग्न करू नकोस कारण दिया आणि माधवन दोघे एकमेकांवर प्रेम करतात.) दोन मिनिटांहून कमी लांबीचे हे गाणे, पण हॅरिस जयराजने अतिशय सुंदर संगीत दिलेय. तामरई ने गीत लिहिलेय. व्यक्तीशः मला संगीतच जास्त आवडले. पण पहिल्या ४ ओळी अगदीच सुरेख आहेत. मागे कधीतरी मी अनुवाद करावा म्हणून बसलो होतो. पहिल्या चार ओळींचा केला आणि त्यानंतर मला जे सुचत गेले ते लिहित सुटलो, अनुवाद राहिला बाजूला ! ;) एक कविता तयार झाली होती. ती बझ्झवर टाकली, आणि बर्‍याच वाचकांना पसंतही पडली होती. प्रेरणा मात्र मूळ गाणे असल्याने काही साम्यस्थळे नक्कीच असतील. सरतेशेवटी मी मूळ गाण्याचेदेखील अनुवाद पूर्ण केले आहे.वैरामुत्तू सरांव्यातिरिक्त एखाद्या दुसर्‍या गीतकाराचे गीत प्रथमच अनुवादित करतोय.



माझी कविता आणि मूळ कविता दोन्ही देतोय.


आधी मूळ गाण्याचा अनुवाद(गाणे जसे आहे,तसाच अनुवाद देण्याचा प्रयत्न केलाय.) :




दोन्ही नजरा तुझ्याच ..


पापण्य़ा तुझ्याच ..


स्वप्नं मात्र


माझी, फक्त माझीच




दिवस लांबलेत , तू कुठे गेलीस ,


कसली शिक्षा मी इथे जगतोय ..


फक्त आठवण , फक्त आठवण...




दोन्ही नजरा तुझ्याच ..


पापण्य़ा तुझ्याच ..


स्वप्नं मात्र


माझी, फक्त माझीच




दिवस लांबलेत , तू कुठे गेलीस ,


कसली शिक्षा मी इथे जगतोय ..


फक्त आठवण , फक्त आठवण...


फक्त आठवण ,तुझीच आठवण




प्रेमात जखमी झालो असता झोप इथे कुठे ?


फक्त आठवण , फक्त आठवण...


(


Iru Vizhi Unathu.. Imaigalum Unathu..


Kanavugal Mattum.. Enathey Enathu..


Iru Vizhi Unathu.. Imaigalum Unathu..


Kanavugal Mattum.. Enathey Enathu..




Naatkal Neeluthey Nee Engo Poanathum


Aaen Thandanai Naan Ingae Vaazhvathum


Orae Nyaabagam.. Orae Nyaabagam..


Iru Vizhi Unathu.. Imaigalum Unathu..


Kanavugal Mattum.. Enathey Enathu..




Naatkal Neeluthey Nee Engo Poanathum


Aaen Thandanai Naan Ingae Vaazhvathum


Ohoa Hoa.. Orae Nyaabagam..


Ohoa Hoa.. Unthan Nyaabagam..




Kaathal Kaayam Naerumbothu Thookkam Ingu Aethu


Orae Nyaabagam.. Orae Nyaabagam..


)

या गाण्यातून प्रेरणा घेऊन मी केलेली कविता :-




डोळे तुझेच ,


पापण्य़ा तुझ्याच ..


पण पापण्य़ांआडची स्वप्नं


फ़क्त माझीच ..


हृदय तुझेच ,


स्पंदने तुझीच ..


पण प्रत्येक श्वास


फ़क्त माझाच .


ती रात अन्‌ ते स्वप्न कुठे आहे?


हृदयात सामावलेले माझे प्राण कुठे आहे?






माझ्या जखमांवर प्रेमाने घातलेली फ़ुंकर,


अन्‌ नजरेतली ती तळमळ..


आता फ़क्त आठवणी....


फ़क्त आठवणी...






मधुमयी त्या राती भेटीच्या,


अन्‌ प्रेमाचा वाहता निर्झर..


आता फ़क्त आठवणी....


फ़क्त आठवणी...






भळभळणारी जखम माझी,


आता भरेल काय ?


तुझ्या ओठी माझे


नाव असेल काय ?






मिन्नलेची सारीच गाणी सुंदर आहेत ! वसीगरा (जरा जरा..), वेनमदी वेनमदी (सच कह रहा हैं दिवाना ) वगैरे गाण्यांचा सुद्धा मराठी अनुवाद करायला काय हरकत आहे ?

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

निबंध :-- माझे आवडते पक्वान : हलवा

'मर्ढेकरांची कविता' : बेकलाइटी नव्हे, अस्सल !

काही चारोळ्या - १

माउस पाहावे चोरून !

द ग्रीन फ़्लाय