अलविदा....

              कॉलेजचे शेवटचे सत्र (मराठीत ’सेमिस्टर’) म्हणजे जरा भावनिकच असते. कॅम्पसमध्ये एकंदरित धमाल असतेच. प्लेसमेंटची गडबड, प्रोजेक्टचे टेन्शन, शेवटचे वर्ष म्हणून आसमंत भरून मस्ती करायची उर्मी, आणि या सगळ्यांचा जोडीला एक हळवेपणाची किनारदेखील असते.. "हे दिवस आता परत येणार  नाहीत " ह्याची पुरेपुर जाणीव असते; आणि त्यात हा "फ़ेअरवेल " नावाचा हृदय पिळवटून टाकणारा प्रकार असतो.. जर एखादा दगड या फ़ेअरवेलला आला तर त्याच्या आतूनसुद्धा अश्रूंचे कारंजे फ़ुटतील.. फ़ायनल ईअरच्या पोरांनी रडलेच पाहिजे अशी तजवीज हे ज्युनिअर लेकाचे या फ़ेअरवेलचे कार्यक्रम आखतांना करतात.

      अस्मादिकसुद्धा कधी काळी कॉलेजला गेलेले. अस्मादिकांना त्यांच्या ज्युनिअर्सनी फ़ेअरवेल दिलेला; आणि अस्मादिक खबरदारीचा उपाय म्हणून खिशात २-२ हॅंकीज(रुमाली हो !) घेऊन गेलेले, पण मरण कुणाला चुकतंय हो ? 

       अजूनही तो दिवस आठवला की मन हळवे होते. फ़ेअरवेलचा दिवस होता म्हणून आमच्या ज्युनिअर्सनी आम्हाला वाट्टेल ते करण्याचे स्वातंत्र्य दिलेले..मग काय, उधळलो आम्ही.. एकदा तरी सार्वजनिक स्थळी, चार लोकांत आपला गळा साफ़ करण्याची इच्छा होती, बिन्दास गायची इच्छा होती. ती इच्छा आम्ही इथे पूर्ण करून घेतली. आपल्या अति-बेसूर्‍या आवाजात आम्ही समोर माईकवर "पापा कहते हैं बड़ा नाम करेगा.. " गायलो.. तो फ़ेअरवेलचा दिवस होता म्हणून आम्ही बचावलो, नायतर आमचा खूनच पाडला असता त्यांनी..गळा साफ़ करायच्या हौसेपोटी स्वतःच साफ़ झालो असतो.. पुढे परिसरातल्या श्रवणव्यंगवाल्या वैद्यांचा-डॉक्टरांचा धंदा बराच वाढला असे कळले.. मानसोपचारतज्ञांकडे पण बरीचशी गर्दी झाली होती. 

       पण एवढ्यात शांत बसतील ते स्वामी कसचे. " मौका भी हैं, दस्तूर भी हैं " याची जाणीव झाली आणि आमची उपजत काव्यप्रतिभा "काव्य -काव्य" कोकलू लागली. "मुसिबत आती हैं तो अकेली नहीं आती, अपने भाई-भतिजों को साथ लेकर आती हैं " याची आता त्या बिचार्‍यांना जाणीव होणार होती. त्या दिवशी सुदैवाने (आणि त्यांच्या दुर्दैवाने)माझ्या खिशात पेन आणि कागद होते. बस , बसल्याबसल्याच काही ओळी पाडल्या, तेवढ्यात सूत्रसंचालन करण्यार्‍या आमच्या कनिष्ठकेने (म्हणजे ज्युनिअर मुलगी हो) "आ बैल मुझे मार" केले. " If any of you wanted to say something, please come here ! "  आम्ही लागलीच कविता पूर्ण केली. उभे झालो, चष्म्याची दांडी सेट केली, (हो, काव्यवाचनाआधीची ही एक मह्त्त्वाची स्टेप आहे.) पुढ्यात जाऊन म्हणालो, " यप, आइ वॉन्टेट टू से समथिंग. आइ’व रिटन फ़्यू लाईन्स फ़ॉर दिस ऑकेज़न. आइ’ड लाइक टू शेअर देम.. " (लगीतच इन्गलिस झाली होती देवा त्या दिवसाले !).. आणि आम्ही ज्या ओळी त्या गरीब बिचार्‍यांना ऐकिवल्या, त्यांच पुढे  " अलविदा " या कवितेच्या स्वरूपात अजरामर होणार होत्या. 

       तर माझ्या प्रिय वाचक मित्रांनो,पेशे-खिदमत हैं........  " अलविदा " मंजिलों की तरफ भागते कदम..

कुछ राहें पीछे छोड़ जाएँगे..

यादों के जंगल अब और भी घने हो जाएँगेहम शायद ही रोक पाएँ
आँसुओं को बहने से..
होंट भी अब थर्राते हैं
 अलविदा कहने से..
कारवाँ बढ़ता रहेगा..
गुबार उड़ते रहेंगे..
यादों के जंगल अब और भी घने हो जाएँगे


 Assignment copies से शुरू होती कहानियाँ...
 कैंटीन में ख़त्म होती कहानियाँ....
चाय के प्यालों में बीती लम्हों सी रातें....
और हर लेक्चर जैसे कई सदियाँ..
बेरहम जिंदगी की भागदौड़ में ..
अब समय देखना भूल जायेंगे..
                       यादों के जंगल अब और भी घने हो जाएँगे


खट्टी यादें, मीठी यादें..
प्यार की, तकरार की यादें ..
होंटों पे लाएगी मुस्कुराहटें.. 
नम पलकों  के पीछे यादें..
जो अब हमें तंग करते हैं
उन्ही पलों को हम तरस जायेंगे..
यादों के जंगल अब और भी घने हो जाएँगेपल-पल साथ रहने वाले दोस्त भी
ऑरकुट और फेसबुक में नज़र आएंगे..
slambook के पन्ने भी..
अपनी कहानियाँ बयाँ करेंगे..

यादों के जंगल अब और भी घने हो जाएँगे ८ टिप्पण्या:

 1. यादों के जंगल अब और भी घने हो जायेंगे.. !
  भारी स्वामी ! :)
  आणि त्या तुमच्या धाडसाचे कौतुक करावे तितके थोडेच ! अगदी स्टेजवर बिजवर पोचलात की तुम्ही भाऊ ! व्वा व्वा ! :)

  हे माझं जंगल इतकं गर्द आहे की आता मला त्यातून रस्ताच सापडत नाहीये !

  उत्तर द्याहटवा
 2. जो अब हमे तंग करते है
  उन्ही पलों को हम तरस जायेंगे... So true ..

  मस्तच स्वामी ....

  उत्तर द्याहटवा
 3. धन्यवाद अनघाताई !
  हो ना, त्या दिवशी मी माझे सारे धाडस एकवटून गेलेलो, आपण सिनिअर असल्याचा पुरेपुर फ़ायदा उठवला मी ! :)
  म्हणजे तुम्ही "आठवणींच्या जंगलात हरवलात की !
  आमचेही जंगल हळूहळू गर्द होत जाणार.. :(

  उत्तर द्याहटवा
 4. लिना, धन्यवाद !
  खरेच खरे आहे ना ? आता ते दिवस खूप मिस होतात. :(

  उत्तर द्याहटवा
 5. संकेत, कॉलेजचे दिवस किती romantic असतात न.

  आणि हो कविता सुंदर आहे हं...

  उत्तर द्याहटवा
 6. स्वामी.. भारीच कविता रे एकदम !! मस्त लिहिलंयस...

  उत्तर द्याहटवा
 7. श्रीराज, ब्लॉगवर स्वागत !
  कॉलेजचे दिवस खरेच रोमॅन्टिक असतात रे .. धमाल !

  धन्यवाद रे..

  उत्तर द्याहटवा

Share

Twitter Delicious Facebook Digg Stumbleupon Favorites More