निसर्गाशी एकरूप होतांना - ठाकुरांचे ’आकाश भॉरा शूर्जो तारा ’


आपण या निसर्गाचा एक भाग आहोत ही जाणीव जेव्हा होते तेव्हा मनात नेमक्या कोणत्या भावना येतात ? निसर्गाच्या सौंदर्याचा आविष्कार जेव्हा अनुभवतो, तेव्हा मन कसे पाखरू होते ना ?

   रबिंद्रनाथ ठाकूरांचे ’आकाश भॉरा शूर्जो तारा ’ हे असेच एक सुंदर गीत. निसर्गात रोजच घडणार्‍या गोष्टींकडे बघण्याची एक नवीच दृष्टी इथे आपल्याला दिसते. निसर्गाच्या विविध रूपांत आपले स्थान गवसल्यावर उचंबळून येणार्‍या भावना गुरुदेवांनी सहजसोप्या आणि गेय शब्दांत गुंफ़ल्या आहेत. शेवटच्या ओळी तर हा ’स्वत्वा’चा साक्षात्कार अगदी अचूक पकडतात.

" कान पेतेछी,
चोख मेलेछी,
धॉरार बुके,
प्राण ढेलेछी
जानार माझे ओजानार
कोरेछी शोंधान "

एकदा का स्वत्वाचा साक्षात्कार झाला की नेहमीच्याच ओळखीच्या गोष्टींकडे बघण्याचा दृष्टीकोण बदलतो आणि मग सुरु होतो ज्ञातांमधल्या अज्ञातांचा शोध..

या गीताचा मी माझ्या परीने मराठीत अनुवाद करायचा प्रयत्न केला आहे. या प्रयत्नात मला मोलाच्या सूचना देणार्‍या सविताताईंचे आभार. 

         
    आधी मूळ बांग्ला गीत :

आकाश भॉरा शूर्जो तारा
बिश्शो भॉरा प्रान
ताहारी माजखाने
आमी पेछी मोर स्थान
बिश्शोये ताइ जागे आमार गान

ऑशिम कालेर
जे हिल्लोले 
जोआर भाटाय
भुबोन डोले
नाड़ीते मोर रॉक्तोधाराय
लेगेछे तार तान

घाशे घाशे पा फ़ेलेछी
बोनेर पॉथे जेते
फुलेर गॉंधे चॉमोक लेगे 
उठेछे मॉन मेते
छोढ़िये आछे आनोन्दरइ दान

कान पेतेछी,
चोख मेलेछी,
धॉरार बुके,
प्राण ढेलेछी
जानार माझे ऑजानारे
कोरेछी शोंधान

 देबोब्रतो बिश्वास, शागोर सेन, श्राबोनी सेन, श्रीकांतो आचार्य अशा अनेक गायकांनी आपापल्या शैलीत हे गाणे गाईले आहे.  मी जुने देबोब्रतो बिश्वास ह्यांनी गायलेले गीत देतोय आणि नवे श्रीकांतो आचार्य ह्यांचे.







मराठी अनुवाद :

आकाशी पसरले
सूर्य चंद्र तारे
विश्वात भरले
जीवन सारे

यात मला गवसले
माझे स्थान
विस्मयाने स्फ़ुरले
माझे गान

असीम काळाची
जी उचंबळते
भरती-ओहोटी
अ‍न जग झुलते
धमन्यांतून माझ्या
रक्तधारांत जाणवते
तीच ओढ

रानवाटांवर चालतां
पाउले चुंबती तृणपाती
गंध फुलांचा हरवी देहभान
वेडावले मन
मिळाले आनंदाचे दान

कान वेधले, डोळे उघडले
धरेच्या कुशीवर प्राण उधळले
ज्ञातांमाजी अज्ञातांचा
सुरु झाला शोध 



टिप्पण्या

  1. स्वामी, या सुंदर अनुवादाच सगळ श्रेय पूर्णत: तुमचच आहे
    दोन्ही गायकांनी गायलेले गीत आवडले, कुठले सरस आहे हे सांगणे अवघड आहे!

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. कसचं, कसचं ! :)
      दोघांचेही सरस आहेच, कधी सागर सेन यांचेही ऐका.त्यांनीही खूपच छान गायलेय. श्राबोनी सेन तशा माझ्या आवडत्या गायिका आहेत, पण त्यांच्या गाण्यात वाद्यांची निवड आणि ’फ़ोडणी’ किंचीत चुकलीये असे वाटले.पण आवाज आणि गायन नेहमीसारखेच सुंदर ! का कोण जाणे, पण माझे सर्वाधिक आवडते वर्शन हे देबोब्रतो बिश्वास यांचेच आहे. :)
      प्रतिसादाबद्दल आभार

      हटवा
  2. श्रिया, आतिवस, राज यांच्याशी पूर्णपणे सहमत! खरंच अतिशय सुंदर गाण्याचे अतिशय सुंदर अनुवाद!

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

निबंध :-- माझे आवडते पक्वान : हलवा

'मर्ढेकरांची कविता' : बेकलाइटी नव्हे, अस्सल !

काही चारोळ्या - १

माउस पाहावे चोरून !

द ग्रीन फ़्लाय