पोस्ट्स

सालगिरह

हर बरस सालगिरह पर यूँ ही हँसते हँसते हर कोई उम्र में इक साल बढ़ा लेता है वक़्त एक सेंध लगाता हुआ आहिस्ता से उम्र के पेड़ से एक शाख चुरा लेता है वक़्त के अपार इतिहास में झाँको तो ज़रा कहाँ वर्तमान, कहाँ भूत, कहाँ भविष्य है उम्र बढ़ती नहीं घटती हैं, हर एक साल के बाद वक़्त आगे नहीं पीछे की तरफ़ चलता है वक़्त आज़ाद परिन्दा हैं, ये अमर है आज तक ये किसी ज़ंजीर से जकड़ा न गया तर्क और भावनाओं की सब कोशिशें नाकाम रहीं ये परिन्दा किसी शिकारी से पकड़ा न गया ज़िन्दगी तो ग़मों की किताब हैं दोस्त साल के बाद पन्ना जिसका उलट जाता है पढ़ चुके कितना इसे, बाक़ी बची है कितनी ऐसा सोचा तो दिल आँखों में सिमट आता है मौत का ज़िक्र भयानक है, मगर आज के दिन, उल्टी लटकी हुई तसवीर को कुछ सीधा करें फ़िक्र और  अहसास की इक और बुलन्दी छूकर आओ, कुछ देर तक माहौल को गंभीर करें..... !! -- मैंने मूल उर्दू नज़्म का हिंदुस्तानी(हिंदी+उर्दू, बोलचाल की भाषा) में अनुवाद किया है. कवी का नाम तो पता नहीं, लेकिन इतनी खूबसूरत नज़्म लिखने के लिए उन्हें शुक्रिया ज़रूर कहूँगा..

वही

जुनी काही पाने दुमडलेली स्वप्नांच्या वहीत... काही होत्या विस्मृतीत  गेलेल्या  कविता.. वेड्या वयातल्या वेड्या मनाच्या संहिता.. कोणाचे अल्लड स्मित  आठवणींच्या कुपीत.. काही रोजच गोंजारलेले मोरपिसांचे गुपित... थोडे शब्द बापुडे चिंब ओले आठवणींत.. काही भावना कोसळत्या जलप्रपातात ... होते काही मौक्तिकबिंदू गळालेले कातरवेळी... होती चाहूल लागलेली  कुणाची वेळी - अवेळी.. एक प्रयत्न उधाण वारा कवटाळण्याचा.. नि होता एक  प्रयत्न आसमंत गवसण्याचा होते काही क्षण रेंगाळलेले उंबर्‍यावर एक पिंपळपान भरकटलेले वार्‍यावर चाळता ती पाने  जाणीव झाली मजला.. संसार माझा स्वप्नांच्या सरणावरी  सजला.. वही जाळली मी आज माझ्या  स्वप्नांसहित ....

जी ढूँढता हैं....

जी ढूँढता हैं फिर वोही फुरसत के रात दिन... हिवाळ्यात कोवळ्या उन्हात.. अंगणात बसून चटईवर... बेकंबे घोकणे,बाराखडी कोरणे मग उग्गाच थोडे लोळणे.. आईने केस विंचरून दिले की.. शाळेला पळत सुटणे दप्तर टाकून पाठीवर.. जी ढूँढता हैं फिर वोही... उन्हाळ्यात पेंगुळलेल्या दुपारी.. छपरांतून डोकावणारे कवडसे.. ते कासव टाकीतले इवलेसे.. किती गार गार वाटायचं.. हात लावलं त्याला की ते बेटं अंग चोरायचं.. तळाला जाऊन लपत असे.. जी ढूँढता हैं फिर वोही... पावसाळ्यात डबक्यात.. शाईची कलाकारी.. भेपकी उडवणे.. अन्‌ ’त्या’ तळ्यात माझा पाय ’खपणे’... उधाणलेल्या वार्‍यात फिरवलेली चकरी.. जी ढूँढता हैं फिर वोही... पावसाळी नदीतल्या कागदी होड्या.. भिंतीवरून मारलेल्या रेतीत उड्या.. कैर्‍या तोडणे..लाखोळी चोरणे.. गुरांच्या मागे धावत जाणे.. टोपलं घेऊन शेण गोळा करणे.. चाक ’पजवत’ गावात भटकणे अन्‌ भातुकलीत राजा-राणीच्या जोड्या.. जी ढूँढता हैं फिर वोही फुरसत के रात दिन... - १८ एप्रिल, २०१२ ,  पुणे 

ज़िन्दगी गाती हैं मर्सिया

सुर्ख होते सबेरे जैसे जलते अँगारे मायूसी की दीवारें बिखर जाती हैं खुशियाँ ज़िन्दगी गाती हैं मर्सिया शब्दों की सिलवटें नज़्मों की कराहटें दिल-धड़कन झूटे झूटे हैरत में हैं काफिया ज़िन्दगी गाती हैं मर्सिया सपनों का आँगन मर गया यौवन सुखा भादो सुखा सावन बैसाख जैसे हैं सदियाँ ज़िन्दगी गाती हैं मर्सिया   मैं जो हूँ तर-बतर शबो-सहर,आठों पहर अश्के-दिल या खूने-जिगर अपनी अपनी हैं कहानियाँ   ज़िन्दगी गाती हैं मर्सिया जिस्म के ताबूतों में बेजान बुतों में   दिखावटी रुतों में रूहों की हैं परछाइयां ज़िन्दगी गाती हैं मर्सिया उम्मीदों का मर्सिया सपनों का मर्सिया रिश्तों-नातों का मर्सिया हर लम्हा हैं मर्सिया ज़िन्दगी गाती हैं मर्सिया

काही चारोळ्या - १

कधी काळी सहजच लिहील्या गेलेल्या ह्या चारोळ्या... पहिली वगळता इतर सर्व बझ्झवर टाकल्या होत्या.  १ ) त्याचे नशीब माझे असते तर बरे झाले असते दगडावरची रेघ खोडणे एवढे पण सोपे नसते   २) तुझ्या त्या आठवणी, तुझे ते भास.. रखरखत्या वाळवंटी , मृगजळाचे आभास.. कधी दचकून उठावे, रात्री अवचितच.. तूच निजलीस शेजारी, खोटा ठरतो विश्वास..   ३) सावध असतो मी , आता स्वप्न बघतांना  स्वप्नातली तू , काल प्रत्यक्षात दिसलीस.... माझ्या बंद पापण्यांच्या कैदेतून गं तू  कशी काय फरार झालीस ?   ४) सारेच बंध तोडून ये.. अशी धाव सैरभैर ये.. रातीला कवेत घेतो मी.. चांदण्यांना लपेटून ये..   ५) काळोखाच्या सावलीत... उदास कुजबूज... काजव्यांच्या ओठी.. चांदण्यांचे गुज..    ६) रक्तिम क्षितिजावर.... स्वप्न उदयास आले.. पंखातील चैतन्य.. आसमंत झाले...  

निसर्गाशी एकरूप होतांना - ठाकुरांचे ’आकाश भॉरा शूर्जो तारा ’

इमेज
आपण या निसर्गाचा एक भाग आहोत ही जाणीव जेव्हा होते तेव्हा मनात नेमक्या कोणत्या भावना येतात ? निसर्गाच्या सौंदर्याचा आविष्कार जेव्हा अनुभवतो, तेव्हा मन कसे पाखरू होते ना ?    रबिंद्रनाथ ठाकूरांचे ’आकाश भॉरा शूर्जो तारा ’ हे असेच एक सुंदर गीत. निसर्गात रोजच घडणार्‍या गोष्टींकडे बघण्याची एक नवीच दृष्टी इथे आपल्याला दिसते. निसर्गाच्या विविध रूपांत आपले स्थान गवसल्यावर उचंबळून येणार्‍या भावना गुरुदेवांनी सहजसोप्या आणि गेय शब्दांत गुंफ़ल्या आहेत. शेवटच्या ओळी तर हा ’स्वत्वा’चा साक्षात्कार अगदी अचूक पकडतात. " कान पेतेछी, चोख मेलेछी, धॉरार बुके, प्राण ढेलेछी जानार माझे ओजानार कोरेछी शोंधान " एकदा का स्वत्वाचा साक्षात्कार झाला की नेहमीच्याच ओळखीच्या गोष्टींकडे बघण्याचा दृष्टीकोण बदलतो आणि मग सुरु होतो ज्ञातांमधल्या अज्ञातांचा शोध.. या गीताचा मी माझ्या परीने मराठीत अनुवाद करायचा प्रयत्न केला आहे. या प्रयत्नात मला मोलाच्या सूचना देणार्‍या सविताताईंचे आभार.                आधी मूळ बांग्ला...

ठाकुरांचा आर्त स्वर - ’आज ज्योत्स्नाराते’

इमेज
   रबिंद्र संगीताबद्दल ऐकून होतो, पण प्रत्यक्षात कधी ऐकले मात्र नव्हते. ऑगस्ट २०११ चा कुठलातरी शुभदिन. खरेतर रात्र, त्यादिवशी रात्रपाळीला होतो. फारसे काम नव्हते. अचानक आठवले की आपल्याला रबिंद्र संगीताबद्दल जाणून घ्यायचे आहे. विचार केला आधी ऐकूया जरा. यूट्य़ूब उघडले. ’रबिंद्र संगीत’ टाकून शोध घेतला. एक गाणे दिसले, ’आज ज्योत्स्नाराते’, लावले. सुरुवात 'इसराज’ या वाद्याच्या दर्दभर्‍या तुकड्याने होते. आणि २ मिनटानंतर शहाना बाजपेईचा आवाज जादू करायला सुरुवात करतो. जसजसे गाणे पुढे सरकते तसतसे ते गाणे, ते संगीत, शहानादिंचा आवाज आणि गुरुदेवांचे ते  शब्द काळीज चिरत  जातात.     गुरुदेवांनी अशी मन कातर करणारी कविता का लिहीली असेल आणि त्याला तितकीच आर्त चाल का लावली असेल असा प्रश्न पडतो. मग ह्या गीताच्या पार्श्वभूमीबद्दल जाणून घेतले. कळले की, हे गीत ठाकूरांनी त्यांच्या मुलाच्या ’शमिंद्रनाथ’ च्या मृत्यूनंतर लिहीले. शमिंन्द्रनाथ त्यांचा धाकटा मुलगा, वयाच्या अवघ्या तेराव्या वर्षी कॉलरामुळे वारला. याआधी काही काळापूर्वीच त्...