स्वामी संकेतानंद कहिन
कधी कधी आपल्या भोवताली एखादी घटना घडते आणि नकळत आपण आपल्या मताची पिंक टाकतो. एखादा कवीमनाचा असेल तर तो कवितेच्या स्वरुपात पिंक टाकेल. आपण अशा कवितांना "वात्रटिका " म्हणतो. वात्रटिकांना साधारणतः चारोळींचे स्वरूप असते.मी अशाच काही छोट्या छोट्या वात्रटिका लिहिल्या. खरे तर ह्यांना कविता तरी म्हणावे का , हा प्रश्न मला पडलाय. सहज सुचलेल्या काही ओळी, एखाद्या घटनेवर भाष्य करतात. ह्या मुक्तछंदात लिहिलेल्या आहेत,ओळींची संख्या निश्चित नाही, अगदीच स्वैर आहेत. कोणतेही शीर्षक नसलेल्या ह्या छोटेखानी कविता( की वात्रटिका ? ) मी " स्वामी संकेतानंद कहिन " या प्रकारात टाकतो. अशा चार " कहिन " मी इथे देतोय. स्वामी संकेतानंद कहिन क्र. १ >> ...