पोस्ट्स

स्वामींचे अभंग -१

  आयटीचे अभंग     क्युबिकली दिन । कंटाळवाणा सारा ॥ कामाचा भारा । रोजचाच ॥ कीबोर्डवरी नुस्ती । बोटे चालली ॥ रात्र विझली । कामापायी ॥ आयटीत गेला । गुदमरून जीव ॥ कोणा नाही कीव । स्वामी म्हणे॥     कळपाचा मेंढर । तैसा मी चाललो ॥ रुततच गेलो । गाळात या॥ स्वतंत्र प्रज्ञा । विझुनिया गेली ॥  निर्बुद्ध हमाली । केली सारी ॥ आता गा देवा । करावी सुटका ॥ झालो मी फाटका । स्वामी म्हणे॥    

श्रावणमासी हर्ष-मानसी

माझ्या लाडक्या कवींच्या, बालकवींच्या ’श्रावणमासि हर्ष मानसी’ या माझ्या आवडत्या कवितेचे हे विडंबन त्यांची क्षमा मागूनच सादर करत आहे. श्रावणमासी हर्ष-मानसी, फिरायला जाती सिंहगडी रुटीन चूकवून,बाईक दामटून,वाट करती वाकडी विकेंड बघता ओघ गाड्यांचा गडावरी चाललासे जत्रा भरली काय गडावरी, क्षणोक्षणी मज भासे झालासा सूर्यास्त वाटतो, क्यामेरा त्वरेने तो काढे तानाजी कड्यावर पोज दिली, फ़ोटो काढा ना गडे उठती वरती जलदांकडे पाहण्यास वेळ नसे सर्व प्रेयसीवर होय रोखिले क्यामेर्‍याची लेन्से दुकानमाला दिसता भासे शॉपिंग कॉम्प्लेक्स इथे चढूनि येती गडावरती, खादाडीस की एकमते कचरा करूनि प्लास्टिकचा गडावरी वावरती सुंदर ललना हिरव्या कुरणी मित्रासंगे बागडती पार्ट्याही होती रानी, डीजे आसमंती घुमे फ़ेसाळ पेला बोले, हवी कशाला परमिट रुमे व्हिस्की कॅन उघडला विपिनी,धुंद गंध दरवळला बघता तिथे पोलिसमामा, मन अति कळवळला महागडी गाडी घेऊन साथी घाटावरूनि चढती आले मनी, निघाले झणी,गोंधळ घालाया वरती गडदर्शना निघती ललना, हर्ष येई कराया क्लिक वॉलवर त्यांच्या बघून घ्यावे, श्रावण महिन्याचे ’पिक’ ---पुणे, २ ऑग...

पाडाडी- विडंबनासाठी कच्चा माल- भाग १

माझ्या काव्यरसिक मित्रहो, विसरलांत तर नाही ना ? प्रदीर्घ कालानंतर परत सार्वजनिक जीवनात येत आहे म्हणून विचारले. जे विसरले त्यांना माझी ओळख करून द्यावयाचा विचार आहे. तर मी कवी स.दा.हितकरे. हो, हो तेच ते कविता पाडण्याची रेसिपी लिहून ज्यांनी होतकरू नवकवींवर अनंत उपकार केले आहेत आणि ज्यांच्या कृपाप्रसादामुळे आज प्रत्येक दुसर्‍या व्यक्तीस कविता प्रसवू लागली आहे तेच ते काव्यभूषण, काव्यकलानिधी, काव्यकुसुमरत्नाकर, काव्यपंडित, काव्यशिरोमणी, काव्यसम्राट कवीश्रेष्ठ स.दा.हितकरे. तसे मला ह्या पदव्या नावापुढे जोडायला आवडत नाही,पण काव्यरसिक चाहत्यांनी इतक्या प्रेमाने हा बहुमान दिला आहे त्याचा अव्हेर करता येत नाही. आता माझ्या काव्यरसिक काव्यप्रेमींपुढे प्रश्न पडला असेल की मी अचानक असा अज्ञातवासात कसा गेलो आणि कसा प्रकटलो. मागील वर्षी एका काव्यसंमेलनात काव्यवाचन करत असतांना माझ्या काव्यतृषार्त श्रोत्यांनी मजवर जो ’प्रेमाचा वर्षाव’ केला त्याचा स्वीकार करून अज्ञातवासात जाण्याचे प्रयोजिले जेणेकरून माझ्या काव्यसाधनेस व्यत्यय येऊ नये. आज अचानक माझ्या सर्व काव्यरसिक काव्यप्रेमींच्या दारावर काकपक्षी कोक...

ठाकुरांची (आणि माझीही) कृष्णकलि

इमेज
बंगाली गीतांमध्ये रुचि घेणे सुरु केले तेव्हाची गोष्ट आहे. आबोहोमान चित्रपटातल्या ’For your eyes only ’ गाण्याबद्दल एका बंगाली फ़ोरमवर वाचले नि ते यूट्य़ूबवर ऐकले. त्या गाण्यात रबिंद्रनाथ ठाकूरांच्या ’कृष्णकलि’ आणि जीबोनानन्दो दासांच्या ’बोनोलता सेन’ ( पुढचा लेख हिच्यावरच आहे. ) ह्या दोन काव्यकन्यांचा उल्लेख येतो.  ही मयनापाड्याची मृगनयनी कृष्णकलि कोण असावी हे कुतूहल तेव्हापासूनचे. कृष्णकलि  यूट्य़ूबवर सहज सापडली आणि मी हिच्या प्रेमातच पडलो. आता ही ठाकूरांची न राह्ता माझीही झाली होती. जिंवत चित्रण करणारे काव्य आणि तेही सहजसोप्या भाषेत कसे असावे ह्याचे सुंदर उदाहरण म्हणजे ’कृष्णकलि’. मात्र हे एवढ्यावर थांबत नाही. सुमारे ११० वर्षांपूर्वी लिहीलेली ही कविता अगदी क्रांतिकारी विचारसुद्धा घेऊन आली आहे. कवी एका काळ्या मुलीच्या प्रेमात पडला आहे. मात्र तो तिच्या काळ्या रंगाकडे न बघता फक्त काळ्या, हरिणीसारख्या डोळ्यांकडे बघत आहे. तसेच काळ्या रंगांचे  आणि आनंदाच्या भारतीय संकेतांचे अद्वैत दाखवून तो म्हणतो की  तुम्हाला तिला जे म्हणायचे असेल ते म्हणा, मी तर तिला कृष्णकलिच (...

सालगिरह

हर बरस सालगिरह पर यूँ ही हँसते हँसते हर कोई उम्र में इक साल बढ़ा लेता है वक़्त एक सेंध लगाता हुआ आहिस्ता से उम्र के पेड़ से एक शाख चुरा लेता है वक़्त के अपार इतिहास में झाँको तो ज़रा कहाँ वर्तमान, कहाँ भूत, कहाँ भविष्य है उम्र बढ़ती नहीं घटती हैं, हर एक साल के बाद वक़्त आगे नहीं पीछे की तरफ़ चलता है वक़्त आज़ाद परिन्दा हैं, ये अमर है आज तक ये किसी ज़ंजीर से जकड़ा न गया तर्क और भावनाओं की सब कोशिशें नाकाम रहीं ये परिन्दा किसी शिकारी से पकड़ा न गया ज़िन्दगी तो ग़मों की किताब हैं दोस्त साल के बाद पन्ना जिसका उलट जाता है पढ़ चुके कितना इसे, बाक़ी बची है कितनी ऐसा सोचा तो दिल आँखों में सिमट आता है मौत का ज़िक्र भयानक है, मगर आज के दिन, उल्टी लटकी हुई तसवीर को कुछ सीधा करें फ़िक्र और  अहसास की इक और बुलन्दी छूकर आओ, कुछ देर तक माहौल को गंभीर करें..... !! -- मैंने मूल उर्दू नज़्म का हिंदुस्तानी(हिंदी+उर्दू, बोलचाल की भाषा) में अनुवाद किया है. कवी का नाम तो पता नहीं, लेकिन इतनी खूबसूरत नज़्म लिखने के लिए उन्हें शुक्रिया ज़रूर कहूँगा..

वही

जुनी काही पाने दुमडलेली स्वप्नांच्या वहीत... काही होत्या विस्मृतीत  गेलेल्या  कविता.. वेड्या वयातल्या वेड्या मनाच्या संहिता.. कोणाचे अल्लड स्मित  आठवणींच्या कुपीत.. काही रोजच गोंजारलेले मोरपिसांचे गुपित... थोडे शब्द बापुडे चिंब ओले आठवणींत.. काही भावना कोसळत्या जलप्रपातात ... होते काही मौक्तिकबिंदू गळालेले कातरवेळी... होती चाहूल लागलेली  कुणाची वेळी - अवेळी.. एक प्रयत्न उधाण वारा कवटाळण्याचा.. नि होता एक  प्रयत्न आसमंत गवसण्याचा होते काही क्षण रेंगाळलेले उंबर्‍यावर एक पिंपळपान भरकटलेले वार्‍यावर चाळता ती पाने  जाणीव झाली मजला.. संसार माझा स्वप्नांच्या सरणावरी  सजला.. वही जाळली मी आज माझ्या  स्वप्नांसहित ....

जी ढूँढता हैं....

जी ढूँढता हैं फिर वोही फुरसत के रात दिन... हिवाळ्यात कोवळ्या उन्हात.. अंगणात बसून चटईवर... बेकंबे घोकणे,बाराखडी कोरणे मग उग्गाच थोडे लोळणे.. आईने केस विंचरून दिले की.. शाळेला पळत सुटणे दप्तर टाकून पाठीवर.. जी ढूँढता हैं फिर वोही... उन्हाळ्यात पेंगुळलेल्या दुपारी.. छपरांतून डोकावणारे कवडसे.. ते कासव टाकीतले इवलेसे.. किती गार गार वाटायचं.. हात लावलं त्याला की ते बेटं अंग चोरायचं.. तळाला जाऊन लपत असे.. जी ढूँढता हैं फिर वोही... पावसाळ्यात डबक्यात.. शाईची कलाकारी.. भेपकी उडवणे.. अन्‌ ’त्या’ तळ्यात माझा पाय ’खपणे’... उधाणलेल्या वार्‍यात फिरवलेली चकरी.. जी ढूँढता हैं फिर वोही... पावसाळी नदीतल्या कागदी होड्या.. भिंतीवरून मारलेल्या रेतीत उड्या.. कैर्‍या तोडणे..लाखोळी चोरणे.. गुरांच्या मागे धावत जाणे.. टोपलं घेऊन शेण गोळा करणे.. चाक ’पजवत’ गावात भटकणे अन्‌ भातुकलीत राजा-राणीच्या जोड्या.. जी ढूँढता हैं फिर वोही फुरसत के रात दिन... - १८ एप्रिल, २०१२ ,  पुणे