पोस्ट्स

एक ऐतिहासिक विजय

एप्रिलमध्ये लिहीलेला हा लेख आता इथे प्रकाशित करतोय. बातमी एव्हाना अगदीच शिळी झाली आहे,  पण त्याला इलाज नाही.  :D  ---संकेत  --------------------------------------------------------------------         २७ मार्च रोजी जागतिक आरोग्य संघटनेने भारतासह आग्नेय आशियाला पोलियो मुक्त जाहीर केले व यासोबतच भारताने दरवर्षी हजारो मुलांना पंगू करणार्‍या एका भयावह रोगावर सुमारे २० वर्षे चाललेल्या लढ्यात एक ऐतिहासिक विजय मिळवला. जागतिक आरोग्य संघटनेच्या आग्नेय आशिया गटातली इतर राष्ट्रे पोलियो मुक्त झालेली असताना भारतामुळे आग्नेय आशिया गटाला अद्याप प्रमाणपत्र जाहीर झाले नव्हते. भारत पोलियो मुक्त करणे हे सर्वात मोठे आव्हान मानले जात होते.             भारताने पोलियो लसीकरण मोहीम हाती घेण्यापूर्वी दरवर्षी हजारो मुले पोलियो ग्रस्त होत, कायमची लुळीपांगळी होत किंवा मृत्यूमुखी पडत. आरोग्याच्या पुरेशा सोयींचा अभाव, दुर्गम वस्त्या, रोजगारासाठी स्थलांतर करणारी कुटुंबे, लसीकरणा विषयीचे गैरसमज अशी अनेक गंभीर आव्हाने भारतापुढे होती....

विडंबन - या भवनातील शीत पुराणे

हे विडंबन देताना कोणाकोणाची माफ़ी मागावी कळले नाही.  या भवनातील शीत पुराणे रवाळ, कडवे खूप, पाजू द्या -  आज येथले सूप माजशक्तीची चाबुक गाथा खरा शूर हो नमवील माथा जुने सूप अन् जुने घराणे हवा नवा तो कूप --- स्वामी संकेतानंद नवी दिल्ली,  ३एप्रील , २०१४ 

बलबन का मकबरा

इमेज
 क़ुतुब मीनारपासून थोड्याच अंतरावर महरौली Archaeological Park आहे. तिथे आडवाटेला , काटेरी झुडपांत अनेक भग्नावशेष विखुरलेले दिसतात. आपण त्यातून मार्ग काढत पुढे जावे.एका मकबर्‍याचे भग्नावशेष दिसतील. खचलेल्या भिंती दिसतील. भिंती कसल्या ? दगडमातीचा निव्वळ रचलेला थर ! त्यावर दिलेला मुलामा पार उडालाय. कधीकाळी भिंतींना मुलामा दिलेला होता, त्यावर नक्षीकाम होते ह्याची साक्ष देणारा एक छोटासा तुकडा तेवढा एका भिंतीवर दिसेल. छत कधीचेच उडालेय. या चार भिंतींच्या आत, आकाशाच्या छताखाली , लाल वालुकाश्मात बांधलेली एक कबर दिसेल. कबरीचे काही दगड गायब झाले आहेत, काही मोडकळीस आलेले आहेत. कधीतरी कबरीवर चढवलेली चादर ऊन-वारा-पाउस झेलत विरजलेली, एका फटीत अडकल्याने , नावापुरती का होईना ,कबरीवर दिसेल.               ही कबर घियासुद्दीन ' बलबन 'ची. तेराव्या शतकाच्या उत्तरार्धात होऊन गेलेला ग़ुलाम घराण्याचा एक प्रबळ सुलतान. दिल्ली आणि परिसरावर बलबनने वीस वर्षे सत्ता गाजवली. बलबन अतिशय कठोर, न्यायप्रिय('न्यायकर्कश' म्हटलं तरी चालेल.) सुलतान होता. सुलतानाला साष्टांग द...

गज़ल- 'आप'

आप यह जो हंगामा खड़ा करते हैं ठीक है, पर क्यों अक्सर बड़ा करते हैं ? वह बड़े भी बच्चे ही कहलाते हैं बारहा ज़िद पे अपनी अड़ा करते हैं आम संभलके रख टोकरीयों में तू इक सड़ा निकले,सारे सड़ा करते हैं आप को रहना होगा सलीके से अब क्योंकि हंगामा हम भी खड़ा करते हैं आप को वह फुर्ती से गिरा सकते हैं आप को जो फुर्ती से खड़ा करते हैं --- संकेत, ०३ जनवरी, २०१४, नई दिल्ली 

विडंबन - अध्यक्ष

अध्यक्ष एक नाट असतो पदाच्या प्रतिष्ठेची लावलेली वाट असतो बोलत असला तरी ऐकवत नाही आता नसला बोलत तरीही 'बोला' म्हणवत नाही संमेलन संपते पंगती उठतात रिकाम्या मांडवात पत्रावळी साठतात अध्यक्ष मनामनात तसंच ठेवून जातो काही लिव्हरचं लिव्हरलाच कळावं असं जातो देऊन काही अध्यक्ष असतो एक धागा वादाला तोंड फ़ोडणारी पीठावरची जागा संमेलन नसलं तेव्हा त्याचं नसतं भान कोटी केली भाषणात की सैरावैरा धावायलाही कमी पडतं रान रसिक येतात जातात कवी मात्र व्याकुळच त्याची कधीच भागत नाही तहान दिसत नसलं डोळ्यांना तरी खोदत गेलो खोल खोल की सापडतेच काव्यसंग्रहांची खाण याहून का निराळा असतो अध्यक्ष ? तो पीठावर नाही तर कोणावर करतात टीका पत्रकार दक्ष अध्यक्ष खरचं कोण असतो ? कोट्यांची खाण असतो लिव्हरची जाण असतो अक्कल गहाण असतो पायातली वहाण असतो तुंबलेली घाण असतो अध्यक्ष असतो फक्त मुलींसाठी लाजतही नाही , वाजतही नाही -- स्वामी संकेतानंद , ६ जानेवारी, २०१४  दिल्ली 

गज़ल - ग़ालिब तेरी दिल्ली में

देख ये अराजकता , हाहाकार; ग़ालिब तेरी दिल्ली में देख ले जम्हूरी* नाटक,व्यापार; ग़ालिब तेरी दिल्ली में वक़्त ये ग़दर* का ना हो, पर 'मातम-ए-यक शहर-ए-आर्ज़ू'* है हर गली, सड़क,कूचा,जमनापार; ग़ालिब तेरी दिल्ली में कब खड़ा मसीहा हो, कब किस रामलीला, जंतरमंतर पर कौन बन उठे गाँधी या सरदार ; ग़ालिब तेरी दिल्ली में जो उखाड़ने आए खरपतवार ; खुद अब उसका हिस्सा हैं हर हकीम हो जाता है बीमार;ग़ालिब तेरी दिल्ली में छोड़ कर गया था दिल्ली तू जो कभी के वैसी ही तो है वो सियासतें, खूनी कारोबार ग़ालिब तेरी दिल्ली में --------------------------------------------------------------- *जम्हूरी = जम्हूरियत का;गणतंत्र का *ग़दर = 1857 का ग़दर *मातम-ए-यक शहर-ए-आर्ज़ू* = आरजू(कामना)के शहर (के उजड़ने) का मातम(शोक) ; ( ग़ालिब का एक शेर ,जो 1857 की दिल्ली की तबाही के बाद लिखा गया था।                "अब मैं हूँ और मातम-ए-यक शहर-ए-आरज़ू    तोड़ा जो तूने आईना, तिमसाल दार था  " ) --- स्वामी संकेतानंद , २१ जनवरी, २०१४, नई दिल्ली 

पोएटिक लिबर्टी

ढिंगच्याक ढिंकच्याक पोएटिक लिबर्टी कूल, हॅपनिंग, फ़ूल्टू डर्टी आला आला श्रावण झोपाळ्यामागे रावण अमेरिकेची गार्‍हाणी गणपत वाणी सिग्गी पितांना मॉलमध्ये फ़िरतांना हाथों में हाथ तेरा मेरा साथ हाड हूड कमॉन डूड व्हॉट्स योर प्रॉब्लम ? नेव्हर माइंड डियर इट हॅप्पन्स हियर अहाहा ! ते दृष्य पहा मला पहा फ़ुले वहा जीवन त्यांना कळले हो कळले ते पाजळले हो हो-हल्ला क्यूँ है भाई ? किसकी मर गई माई ? जीयो जी  भर के एक और पराठा मख्खन मार के हू वन दि मॅच ? डन्नो, आय हॅव फ़्लाइट टू कॅच केल्याने होत आहे रे थांबल्याने मौत आहे रे चला चला पुढे चला पुढच्याच्या पुढे चला समझौता करनेका नहीं कुचल डालो,रुकनेका नहीं छोटी बातों की चिंता छोड़ दो भक्तगणों, गहरी साँस अंदर लो डूड, इट्स क्वाएट ऍब्सर्ड बट आय डू केअर अबाऊट दि वर्ल्ड नवे-पुराणे अधिक-उणे साहित्याचा कागद कागदावरचे साहित्य भेळपुरी भेळपुरी !! होता है अक्सर ऐसा चाहिए प्रसिद्धी या फ़िर पैसा सुबह घर से निकला था कोई पर वो उसका घर था ही नहीं व्हॉट मॉडर्निस्ट ? व्हॉट पोस्ट-मॉडर्निस्ट ? दि होल वर्ल्ड इज ब्लडी अपॉर्च्यु...