प्रात:स्मरणीय आदरणीय रजनीकांतदेव तमिळप्रांतीय चित्रपट-उद्योगाद्वारे आपल्या लीला दाखवून मर्त्य मानवास धन्य जरी करत असले तरी ते मूळचे आपले मराठे माणूसच (हो हो.. शिवाजीराव गायकवाडच..), त्यांचा भक्तवर्ग हा मराठी मुलुखातदेखील असल्याची जाणीव या पामरास आहे, म्हणूनच आम्ही रजनीकांतदेवजींची आरती मराठीमध्ये लिहावयास घेतली.. रजनीकांतदेवजींच्या प्रेरणेनेच ही आरती लिहीली जात आहे..हा त्यांचाच कृपाप्रसाद.... गोड मानून घ्या.. आरती रजनीकांता, महातेजस्वी संता, रक्षिले भक्तगण, असा तू अरिहंता आरती रजनीकांता ॥१॥ सिगरेट भिरकावली, ओठी अलगद झेलली, गॉगल्सची केली भिंगरी, दुष्टांची त्रेधा उडाली ॥२॥ आरती रजनीकांता... सहस्त्र गुंड भारी, एका बोटाने मारी, यमाला मात दिली, तू आमचा कैवारी ।३॥ आरती रजनीकांता... सोकावले सिनेतारे, चैतन्यमय तू उभा रे, तरुणांचा आदर्श आणि, पिडीतांचा अण्णा रे ॥४॥ आरती रजनीकांता... चित्रपट तुझे बघावे, दु:ख घरी ठेवावे, तुझेच नाम ओठी, ध्यानीमनी जपावे ॥५॥ आरती रजनीकांता... सांगावी किती आता, तुझी पराक्रम गाथा, संकेत भक्त तुझा, चरणी ठेवितो माथा ॥६॥ आरती रजनीकांता, महातेजस्वी संता, र...